Admin
Admin
ताज्या बातम्या

पोलीस भरतीत आता तृतीयपंथीयांनाही मिळणार संधी, लवकरच नवे नियम लागू होणार

Published by : Siddhi Naringrekar

पोलीस भरतीत आता तृतीयपंथीयांनीही संधी मिळणार आहे. यासाठी नवे नियमही लागू करण्यात येणार आहेत. तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयारी असल्याची माहिती राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयाला दिली.तृतीयपंथीयांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2023 पर्यंत राज्य सरकार पोलीस भरतीत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र नियमावली बनवणार आहे.  पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी केवळ स्त्री आणि पुरुष, असा पर्याय आहे. तृत्तीयपंथींसाठी अर्ज करण्याचा पर्याय नाही. मात्र नोकर भरतीत तृत्तीयपंथींसाठी पर्याय ठेवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे अपेक्षित होते. मात्र राज्य शासनाने याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळेच तृत्तीयपंथींना पोलीस भरतीसाठी अर्ज करता आला नाही. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये, याची काळजी राज्य शासनाने घ्यायला हवी, असेही न्यायालयाने

तृत्तीयपंथींच्या शारीरीक चाचणीसाठी येत्या दिड महिन्यात नवीन नियामावली तयार करा. तसेच पोलीस भरतीतील तृतीय पंथींची शारीरीक चाचणी २८ फेब्रुवारी नंतर घ्या, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासनाला दिले. त्यामुळे नवीन वर्षात तृत्तीयपंथींना पोलीस भरती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा

Anil Deshmukh : तटकरे साहेब हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले; आमच्या संपर्कात जरी ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही