थोडक्यात
फिलीपिन्समध्ये मोठा भूकंप, 22 लोकांचा मृत्यू
6.9 रिश्टर स्केलचा भूकंप मंगळवारी रात्री उशिरा झाला
भूकंपामुळे अग्निशमन केंद्राची एक काँक्रीटची भिंत कोसळली
फिलीपीन्समध्ये 6.9 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप मंगळवारी रात्री उशिरा झाला आहे. यामध्ये किमान 22 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक जण जखमी देखील झाले आहे. माहितीनुसार, फिलीपिन्सच्या सेंट्रल विसायास प्रदेशातील सेबू सिटीच्या किनाऱ्यावर मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास भूकंप झाला, वीजपुरवठा ज्यामुळे खंडित झाला आणि परिसरातील इमारतींचे नुकसान झाले.
6.9 रिश्टर स्केलचा भूकंप
मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास फिलीपिन्सच्या (Philippines Earthquake) सेंट्रल विसायास प्रदेशातील सेबू सिटीच्या किनाऱ्यावर भूकंप झाला. ज्यामुळे इमारतींचे नुकसान झाले आणि ढिगारा कोसळल्याने अनेक लोक जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भूकंपाचे केंद्र सुमारे 90,000 लोकसंख्या असलेल्या किनारी शहर बोगोपासून सुमारे 17 किलोमीटर ईशान्येस होते अशी देखील माहिती त्यांनी दिली.
अग्निशमन प्रमुख रे कॅनेट म्हणाले की, जोरदार धक्क्यांमुळे घरांच्या काँक्रीटच्या भिंती आणि अग्निशमन केंद्राचे नुकसान झाले आहे. शहरातील वीज खंडित झाली आणि डांबरी रस्त्यांवर खोल भेगा पडल्या. आम्ही आमच्या बॅरेकमध्ये विश्रांती घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा जमीन हादरायला लागली आणि आम्ही बाहेर पळत सुटलो, पण जोरदार भूकंपामुळे आम्ही जमिनीवर कोसळलो असं अग्निशमन प्रमुख रे कॅनेट यांनी सांगितले.
कॅनेट म्हणाले की त्यांच्या अग्निशमन केंद्राची एक काँक्रीटची भिंत कोसळली. त्यांनी सांगितले की त्यांनी आणि त्यांच्या सहकारी अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्यात आणि कोसळलेल्या भिंतींमुळे जखमी झालेल्या किमान तीन रहिवाशांना प्राथमिक उपचार दिले, ज्यात डोक्याला दुखापत झालेल्या एका वृद्ध व्यक्तीचा समावेश होता, ज्यांना त्यांनी जवळच्या रुग्णालयात नेले. त्यांनी सांगितले की तीव्र हादऱ्यामुळे अधिक दुखापत झाली असावी