अनिल ठाकरे, चंद्रपूर
काही अभ्यासक महाराष्ट्रातून माळढोक पक्षी संपल्यात जमा असल्याची भीती व्यक्त करीत आहेत. मात्र महाराष्ट्रात या पक्षाचे अस्तित्व असल्याची सुखद वार्ता आज चंद्रपुरातून मिळाली. जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील एका शेतात हा पक्षी आढळून आला. त्या शेतकऱ्याने चंद्रपुरातील वन्यजीव अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांना फोटो पाठविला. आढळलेला पक्षी माळढोक असल्याचं प्रा. चोपणे यांनी सांगितलं. माळढोक पक्षी आढळल्याच कळताच पक्षीमित्र आणि वन्यजीवप्रेमी मध्ये आनंद संचारला आहे.
माळढोक हा पक्षी भारतात तसेच पाकिस्तानमधील कोरड्या प्रांतात आढळून येतो. माळढोक पक्षाकडे अत्यंत दुर्मिळ पक्षी म्हणून बघितलं जातं. या पक्ष्याच्या स्वरंक्षणासाठी काही राज्यांनी ठोस पावले उचलली आहेत. माळढोक पक्षाला इंग्रजीत " ग्रेट इंडियन बस्टार्ड " असं नाव आहे.महाराष्ट्रातून हा पक्षी नामशेष झाल्याचं अभ्यासक बोलतात. अश्यात चंद्रपुरात हा पक्षी आढळून आल्यानं पक्षीमित्रात आनंद संचारला आहे. चंद्रपुरातील वन्यजीव अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांना वरोरा तालुक्यातील एका शेतकऱ्यानं पक्षाचा फोटो पाठवीला. फोटोत दिसणारा पक्षी माळढोक असल्याचं चोपणे यांनी सांगितलं.
प्राध्यापक चोपणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले " महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात झालेल्या सर्वेत माळढोक पक्षी आढळला नव्हता.चंद्रपुर जिल्ह्यात कोवीड पूर्वी दोनदा सर्वे झाला मात्र त्यावेळीही माळढोक आढळला नाही.आता पहिल्यादाच माळढोक पक्षाची नोंद झाली आहे.वरोरा तालुक्यातील एका शेतकऱ्याला त्याच्या शेतात माळढोक दिसला. त्याने फोटो काढला आणि मला पाठविला. फोटो बघताच मला सुखद धक्का बसला. माळढोक पक्षाच्या संवर्धनासाठी वन विभागाने तात्काळ पाऊल उचलनं गरजेचे आहे."
कसा दिसतो माळढोक
- मोठे, उभे शरीर, उंच पाय यामुळं हा पक्षी लक्ष वेधून घेतोय.याचे मुख्य खाद्य छोटे व मोठे किडे, टोळ, बिया आहेत.