ताज्या बातम्या

...ते लोक शिवसेनेचा चेहरा कसा काय होऊ शकतात? मनीषा कायंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल

Published by : Siddhi Naringrekar

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली. त्यानंतर बंडखोरीनंतर आमदारांसह अनेक पदाधिकारी ठाकरे गट सोडून शिंदे गटात सामील झाले. मात्र, अद्यापही ठाकरे गटाची गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदेही शिंदे गटात प्रवेश केला.

याच पार्श्वभूमीवर मनीषा कायंदे म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि ते मुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा चालवणारी शिवसेना असू शकत नाही. आम्हाला वाटलेलं वर्षभरात यात बदल होईल, परंतु तसं काही झालं नाही.

ठाकरे गटात महिला आघाडीची वर्षभरापासून घुसमट होत आहे.आमच्या देवी देवतांना ज्यांनी शिव्या घातल्या, त्यांची खिल्ली उडवली, ते लोक शिवसेनेचा चेहरा कसा काय होऊ शकतात? हा प्रश्न मला सतावत होता. मला पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा होती. मला त्याचा मोठा अनुभव आहे. असे मनिषा कायंदे म्हणाल्या.

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

हरियाणात भाविकांच्या बसला भीषण आग

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशी स्थगित