Mega Block Team Lokshahi News
ताज्या बातम्या

Mega Block : मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक, जाणून घ्या काय आहे वेळापत्रक?

आज मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा मेगाब्लॉकमुळे खोळंबा होणार आहे. 25 डिसेंबरला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक असणार आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

मुंबई : आज मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा मेगाब्लॉकमुळे खोळंबा होणार आहे. 25 डिसेंबरला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ या वेळेत घाटकोपर येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

वडाळा रोड ते मानखुर्द या हार्बर मार्गावर सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

(छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वांद्रे/गोरेगाव सेवा प्रभावित होणार नाही)

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.४० ते दुपारी ३.२८ पर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.५४ वाजेपर्यंत सुटणाऱ्या पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

विशेष गाड्या

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वांद्रे/गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.३० पर्यंत ट्रान्सहार्बर/मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

ब्लॉक कालावधीत पनवेल – मानखुर्द या मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.

हा मेंटेनन्स मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Festival Vargani : दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात वर्गणीसाठी नियम! धर्मादाय कार्यालयाची परवानगी बंधनकारक

CM Fadnavis On Kabutarkhana : मुंबईतील कबुतरखाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता! मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाची सुचना "कबूतरखाना बंद करणं..."

Uttarakhand : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी! 60 हून अधिक जण बेपत्ता, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Latest Marathi News Update live : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील धरालीत ढगफुटी