ताज्या बातम्या

राज ठाकरे हेलिकॉप्टरने गोपीनाथ गडावर, परळी कोर्टात लावणार हजेरी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळीच्या कोर्टाने समन्स बजावले आहेत. आज त्यांना कोर्टात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

Published by : Siddhi Naringrekar

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळीच्या कोर्टाने समन्स बजावले आहेत. आज त्यांना कोर्टात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. सुनावणीच्या तारखेला सतत गैरहजर राहिल्याने परळी‎ न्यायालयाने त्यांना अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्या प्रकरणात जामीन मिळविसाठी ते आज परळी कोर्टात हजर राहणार आहेत.

2008 मध्ये परळीत मनसे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली होती. मराठी पाट्या आणि मराठी मुद्द्यावर आंदोलन केल्यानंतर बळजबरी दुकानं बंद करणं, दुकानं बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडणं याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज ठाकरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी परळी न्यायालयाने राज ठाकरेंना दोन वेळा अटक वॉरंटही जारी केलं होतं.

परळीत दाखल होण्यापूर्वी राज ठाकरे यांचे हेलिप्टर औरंगाबादमध्ये दाखल झाले होते. औरंगाबादच्या पळशी परिसरात सध्या हे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले होते. इंधन भरण्यासाठी ते या ठिकाणी थांबवण्यात आले होते. याठिकाणी काही वेळ थांबून पुढे ते परळीला रवाना झाले. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते जमा झाले होते.राज ठाकरे परळीतील दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांना कोर्टात 11 वाजता हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!