Sunil Tatkare  Lokshahi
ताज्या बातम्या

"...त्यावेळी विरोधकांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही"; बारामतीत खासदार सुनील तटकरेंचा विरोधकांवर निशाणा

"संपूर्ण महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा आपण सुरु करणार आहोत. या माध्यमातून राज्यातल्या प्रत्येक घटकापर्यंत आपल्याला पोहचायचं आहे"

Published by : Naresh Shende

Sunil Tatkare Speech : अजितदादांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधक हताश झाले. हा निवडणुकीचा जुमला आहे, असा प्रचार विरोधक करतात. निवडणुकीला सामोरं जात असताना महिलांच्या खात्यावर जेव्हा रक्कम जमा होईल, त्यावेळी विरोधकांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. या योजनेच्या विरोधात विधिमंडळात त्यांनी भाषणं केली. ज्यांनी या योजनेला विरोध केला, तेच आता योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरायला रांगेत उभे आहेत. एखादी योजना महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न केला जातो, त्यावेळी त्याचं स्वागत करण्याऐवजी टीका करण्याची भूमिका घेतली जाते. महाराष्ट्राच्या लोककल्याणासाठी जो काही निर्णय घेतला आहे, त्याला संपूर्ण महाराष्ट्राचा पाठिंबा राहील, अशाप्रकारे लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ते बारामतीत राष्ट्रवादीच्या जन सन्मान रॅलीत बोलत होते.

संपूर्ण महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा आपण सुरु करणार आहोत. या माध्यमातून राज्यातल्या प्रत्येक घटकापर्यंत आपल्याला पोहचायचं आहे. अडीच कोटींपेक्षा जास्त महिला भगिनींना याचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य आहे. या देशाच्या कृषी उत्पन्नात महाराष्ट्र खूप मोठ्या प्रमाणावर भर टाकतं. पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली, मराठवाड्यातील अनेक जिल्हे असतील, विदर्भातील जिल्हे असतील, महाराष्ट्राच्या कृषी उत्पन्नात भर टाकण्याचं काम शेतकरी वर्ग करत असतो. मी अजितदादांचं विनम्रपणे अभिनंदन करतो.

शेतकऱ्यांचं शेतीपंपाचं तीन ते साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतचं बिल पूर्णपणे माफ करण्याचा क्रांतीकारी निर्णय तुम्ही घेतला आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने उर्जा दिली आहे. या विभागाचं नाव उर्जा आहे. पण अजितदादांनी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने उर्जा देण्याचं काम केलं आहे. सोयाबिन उत्पादन, कापूस उत्पादक शेतकरी असेल, त्यांना पाच हजार रुपये प्रतिहेक्टरला अनुदान देण्याची भूमिका घेतली. मधल्या कालावधीत कर्जमाफीचा निर्णय घेतला. जो नियमितपणे कर्ज भरतो, त्याला ५० हजाराचं प्रोत्साहन अनुदान दिलं जाईल.

मधल्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली म्हणून ते थांबलं होतं. पण ज्यांनी ज्यांनी नियमितपणे कर्ज भरलं होतं, त्या नियमित कर्जफेड करण्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा ५० हजार रुपये जमा करण्याचं काम अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून केलं आहे. कष्टकरी समाज आहे, तो शेतकरी आहे. स्वत:च्या उत्पन्नात भर घालण्यासाठी तो घाम गाळत असतो. जे काही नैराश्य तुमच्या मनात निर्माण झालं असेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dadar Kabootarkhana :दादरमध्ये आंदोलन चिघळलं; आंदोलनात गोंधळ, पत्रकारांवर पोलिसांची आरेरावी

Latest Marathi News Update live : दादरमधील कबुतरखाना परिसरात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन

Hydrogen Train : भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच सेवेत येणार; रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती

Akshay Kumar : अक्षय कुमारची SUV पोलिसांकडून जप्त; नेमकं प्रकरण काय?