ताज्या बातम्या

'राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं' म्हस्केंचा मोठा गौप्यस्फोट

Published by : shweta walge

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची आज ठाण्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचं होत असा गौप्यस्फोट करत हल्लाबोल केला आहे. तर उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांच्या विचारांपासून, हिंदुत्वापासून दूर ठेवण्याच काम राऊत यांनी केलं असं ते म्हणाले आहेत.

नरेश म्हस्के म्हणाले की, संजय राऊत हे खऱ्या अर्थाने जल्लाद आहेत. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांच्या विचारांपासून, हिंदुत्वापासून दूर ठेवण्याच काम राऊत यांनी केलं. त्यामुळे ते खरे जल्लाद आहेत. राऊत यांनी नगरसेवकाची निवडणूक जिंकून दाखवावी. आमदारामुळे तुम्ही निवडून आला आहात, मागच्या दारातून आपण आला आहात.

राऊत आपण काय बोलताय, कसे वागतात. आठवा ज्या वेळेस आदित्य ठाकरे यांचा आयोध्या दौरा होता तेव्हा आपली भूमिका काय होती. एकनाथ शिंदे यांच्या समोर तुम्ही उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या बद्दल काय बोललात ते सांगा, तुमची त्यावेळची तुमची भूमिका काय होती ती सर्वांना कळू दया. कुलदैवताची शपथ घेऊन सांगा हे खोटं होत नाहीतर काही दिवसांत आम्ही सर्व लोकांसमोर आणू असा इशारा देखील त्यांनी राऊतांना दिला आहे.

दरम्यान, तिन्ही पक्षात कोणतीही नाराजी नाही, युतीमुळे काही फायदे तर काही तोटे आहेत ते वरिष्ठ सोडवत आहेत. हेतू परस्पर काही लोक याचा बाऊ करताय. शिवसेना ठाणे शहर आणि कल्याण लोकसभेवर शिवसेनेचा कित्येक वर्ष खासदार असल्याने आम्ही दोन्ही जागांवर दावा करणारच. तिन्ही पक्षाचे नेते जागा वाटपाबाबत चर्चा करतील आणि ठरवतील, असं देखील ते म्हणाले आहेत.

Cards: पत्ते खेळण्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

CSK vs RCB : सामन्यात पावसाने खोडा घातल्यास बंगळुरुच्या अडचणी वाढणार? काय आहे समीकरण? जाणून घ्या

"२० तारखेला निवडणूक होऊद्या, २१ तारखेला मिटिंग लावतो आणि..."; नाशिकच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Carrom: कॅरम खेळल्याने होतात हे शारीरिक फायदे! जाणून घ्या...

Chess: बुद्धिबळ खेळण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या...