योग आपल्या शरीरासाठी अत्यंत उत्तम व्यायाम आहे. योगामुळे शरीराची ताकद, लवचिकता आणि संतुलन सुधारते. तसेच, तणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते. मनाची शांतता, एकाग्रता वाढवण्यासाठी योग अत्यंत महत्वाचा आहे. तणावमुक्त आणि निरोगी आरोग्यासाठी योग हे उत्तम औषध आहे. याचपार्श्वभूमीवर 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग करण्याचे फायदे आणि त्याबद्दल ची माहिती दिली. जगभरात अशांतता खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने योग अत्यंत महत्वाचे आहेत. असा संदेश त्यांनी यावेळी दिला. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या एका कार्यक्रमात त्यांनी आपला सहभाग दर्शवला होता त्यावेळी त्यांनी योग बद्दलची माहिती सांगितली.
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात जनतेला उद्देशून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग या व्यायाम प्रकाराचे आपल्या जीवनातील महत्व आणि गरज याबद्दल माहिती दिली. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखला जावा, असा प्रस्ताव संपूर्ण जगासमोर मांडला होता.त्यावेळी संपूर्ण जगातील 173 देशांनी या आपल्या भारताच्या निर्णयाला पूर्ण पाठींबा देत 21 जून या तारखेला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मान्यता दिली. आज जगभरातील करोडो लोक आपल्या जीवनात योग या व्यायाम प्रकाराला आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करताना दिसत आहेत.
आज संपूर्ण देशात लठ्ठपणा हा मोठा आजार बनला आहे. त्यामुळे योग या साधनेचा आपल्या जीवनात समावेश करून आरोग्य सुधारणासाठीचा संदेश यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिला. लोकांनी सकस आहाराचे सेवन करावे आणि योग आला एक जनआंदोलन बनवावे असे आवाहन ही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. योग सगळ्यांचा आहे आणि सगळ्यांसाठी योग आहे. योग हे स्वतःपुरते मर्यादित न ठेवता त्याला जनआंदोलनाचे स्वरूप द्या. आणि मानवतेच्या भल्यासाठी योग ही साधना आपल्या आयुष्यात आत्मसात करा असा संदेश आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.