पंजाब किंग्जचा अनुभवी लेग-स्पिनर युजवेंद्र चहल सध्याच्या आयपीएल हंगामात घातक फॉर्ममध्ये आहे. बुधवारी आयपीएलच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाबचा सामना रंगला. यात १९ व्या षटकात चहलने मोठी कामगिरी केली. या षटकात चहलने हॅटट्रिकसह एकूण चार विकेट्स घेतल्या. १९ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने धोनीला आपला बळी बनवले. यानंतर, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर, दीपक हुडा, अंशुल कंबोज आणि नूर अहमद यांना अनुक्रमे पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात आले. यासह, तो पंजाब किंग्जकडून हॅटट्रिक घेणारा चौथा गोलंदाज बनला.
आयपीएलमधील ही त्याची दुसरी हॅटट्रिक आहे. यासह त्याने युवराज सिंगची बरोबरी केली आहे. युवराज सिंगने २००९ मध्ये दोन हॅटट्रिक घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅटट्रिक घेण्याचा विक्रम अमित मिश्राच्या नावावर आहे. त्याने २००८, २०११ आणि २०१३ मध्ये हॅटट्रिक घेतली.
पंजाब किंग्जकडून हॅटट्रिक घेणारे गोलंदाज
२ - युवराज सिंग
१ - अक्षर पटेल
१ - सॅम करन
१ – युजवेंद्र चहल
आयपीएलमध्ये सर्वाधिक चार विकेट घेणारे गोलंदाज
९ – युजवेंद्र चहल
८ – सुनील नरेन
७ - लसिथ मलिंगा
६ – कागिसो रबाडा