ताज्या बातम्या

आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं सादरीकरण

आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं सादरीकरण करण्यात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं सादरीकरण करण्यात येणार आहे. या सादरीकरणाच्या वेळेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, नेते आदित्य ठाकरे आणि माजी मंत्री सुभाष देसाई यांच्यासह ठाकरे गटांचे अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी पाच वाजता मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हे सादरीकरण होणार आहे.

२० फेब्रुवारी २०१९ ला बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक मुंबईच्या महापौर निवासस्थानी करण्याचा निर्णय नगरविकास खात्याकडून घेण्यात आला. दोन टप्प्यात यास मार्गाचे काम पूर्ण केले जाणार असून पहिल्या टप्प्यात २५० कोटी रुपये एवढा खर्च होणार आहे. यात एंट्रन्स ब्लॉक, आर्टिस्ट सेंटर, इंटरप्रिटेशन सेंटर, हेरिटेज कॉन्झर्वेशन, महापौर बंगल्याचा जीर्णोद्धार, संग्रहालय आणि लँडस्केपिंगमध्ये संवर्धन, परिसराचे सुशोभीकरण आहे.

तर दुसऱ्या टप्प्यात १५० कोटी रुपयांचा काम प्रस्तावित होत. यामध्ये लेसर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथन, कथाकथन, फिल्म, संग्रहालय कथनातील ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटकांचा समावेश आहे. स्मारकाचं काम आता अंतिम टप्प्यात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pets Animals : तुमच्याही घरी पाळीव प्राणी असेल तर पावसाळ्यात घ्या 'अशी' काळजी

Latest Marathi News Update live : जयंत पाटील यांनी दिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; शशिकांत शिंदे होणार नवे प्रदेशाध्यक्ष

Jayant Patil : शरद पवारांना मोठा धक्का ! जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

Tennis player Radhika Yadav Murder : "ती चुकीच्या मार्गाने..." राधिका यादव प्रकरणाला नवं वळण