Rishabh Pant Viral Video
Rishabh Pant Viral Video 
ताज्या बातम्या

दिल्ली हरली! पण रिषभ पंतनंं मैदान जिंकलं, ४५४ दिवसांनंतर पुनरागमन, चाहत्यांनी केलं जंगी स्वागत, पाहा Video

Published by : Naresh Shende

इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या हंगामातील दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगला. लियाम लिविंगस्टनने शेवटच्या षटकात षटकार ठोकला अन् दिल्लीचा निसटता पराभव झाला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करून २० षटकांत ९ विकेट्स गमावून १७४ धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जने १९.२ षटकात ६ विकेट्स गमावून १७७ धावा करत विजयी सलामी दिली. परंतु, प्रत्यक्षात दिल्लीचा जरी पराभव झाला असला, तरी कर्णधार रिषभ पंतने मैदान जिंकलं. कारण रिषभ पंतने ४५४ दिवसांनंतर पुनरागमन केल्यानंतर त्याचं चाहत्यांनी जंगी स्वागत केलं. रिषभ पंतच्या स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला नेटकरी प्रतिक्रियांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

विकेटकीपर आणि डावखुरा फलंदाज रिषभ पंतचा डिसेंबर २०२२ मध्ये मोठा अपघात झाला होता. या अपघातामुळे रिषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर पंतच्या गुडघ्याची शस्त्रक्रीया झाली होती. त्यानंतर रिषभला राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत रिहॅबसाठी अनेक महिने मेहनत घ्यावी लागली. आयपीएलचा १७ वा हंगाम सुरु होण्याआधी बीसीसीआयने रिषभला फिटनेस सर्टिफिकेट दिलं आणि तो फिट असल्याचं जाहीर केलं. ४५४ दिवसांनंतर अखेर पंतने मैदानावर पुनरागमन केलं.

इथे पाहा रिषभ पंतचा व्हिडीओ

दिल्ली कॅपिटल्स ७४ धावांवर असताना डेविड वॉर्नर बाद झाला. त्यानंतर रिषभ पंत फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यावेळी मैदानात असलेल्या तमाम चाहत्यांनी त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं. मैदानातील चाहत्यांनी उभं राहून पंतला सन्मान दिला. याचवेळी मोठ्या स्क्रीनवर एक मेसेज लिहिण्यात आला. सांगा, कोण आला? असा मेसेज मैदानातील स्क्रीनवर झळकत होता.

"छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही"; नाशिकमध्ये उद्धव ठाकरे कडाडले

"इंडिया आघाडीच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानची हुजरेगिरी केली"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Daily Horoscope 16 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ; पाहा तुमचे भविष्य

"काँग्रेस फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण करतं"; कल्याणच्या सभेत PM मोदींची तोफ धडाडली

दिनविशेष 16 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना