ताज्या बातम्या

Raj Thackeray On Dreamliners : "ड्रीमलाईनर बद्दल इतक्या तक्रारी असूनही...", राज ठाकरे यांनी विमानाबद्दलच उपस्थित केले प्रश्न

विमान अपघातानंतर ड्रीमलाईनरच्या वापरावर ठाकरे यांची चिंता

Published by : Shamal Sawant

आज दुपारच्या सुमारास गुजरात येथील अहमदाबाद येथील विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण केले. मात्र उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच विमानाचा भीषण अपघात झाला. हा विमान अपघात नेमक्या कोणत्या करणामुळे झाला त्याबद्दल अद्याप खुलासा झाला नाही. मात्र आता विमानाबद्दलच्या काही तक्रारी समोर आलेल्या आहेत. याबद्दलच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही मत व्यक्त केले आहे.

अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात अनेक प्रवासी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुःखद घटना आहे. या घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. तसंच जखमी लवकरात लवकर बरे होऊ देत आणि सुखरूप घरी जाऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

विमान तंत्रज्ञानाबद्दल जरी मला खूप खोल माहिती नसली तरी माझ्या वाचनात काही गोष्टी याच्या आधी पण आल्या होत्या, त्यातून मला काही प्रश्न पडले. बोईंगच्या 'ड्रीमलाईनर' विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या. २०१३ ला पहिल्यांदा जपान एअरलाईन्सच्या विमानाला आग लागली होती. त्यानंतर या विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या. त्या इतक्या होत्या की २०२० ते २०२३ या काळात अनेकदा या विमानांच उड्डाण थांबवलं गेलं होतं.

जानेवारी २०१३ ला तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत जवळपास सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी जवळपास ३ महिने बोईंग ड्रीमलाईनरचं उड्डाण खंडित केलं होतं. आणि मला आठवतंय त्याप्रमाणे २०१३ ला भारतात डीजीसीएने देखील काही काळासाठी या विमानाचं उड्डाण खंडित केलं होतं. जर ड्रीमलाईनर बद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहित असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो ? डीजीसीएने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली ? आजच्या विमान अपघाताविषयी वाचताना अजून एक माहिती समोर आली ती म्हणजे हे विमान २८ जानेवारी २०१४ ला एअर इंडियाच्या सेवेत आलं.

थोडक्यात जगभरात जेंव्हा ड्रीमलाईनरबद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणलं. ड्रीमलाईनरची सेवा २०२० ते २०२३ च्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्याचा इतिहास असताना, एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी ४० हुन अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर दिली... आणि या सगळ्याला सरकारने परवानगी का दिली ? डीजीसीएने इतका पण विचार का नाही केला ?

ही वेळ हे सगळं बोलण्याची नाही असं म्हणलं जाईल. जी घटना घडली ती दुःखद आहे पण म्हणून या विषयावर सरकारने आता तरी गांभीर्य दाखवायलाच हवं. ड्रीमलाईनर्स जर मृत्यूचा सापळा बनणार असतील तर कुठलाही दबाव न सहन करता याची सेवा खंडित करावी आणि वेळेस आधीची ऑर्डर रद्द करावी.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य

Home Loan Intrest Rate : गृहकर्जदारांना दिलासा ! PNB, Indian Bank आणि Bank Of India ने केली व्याजदरात कपात

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'