Sanjay Raut On Pm Narendra Modi
Sanjay Raut On Pm Narendra Modi 
ताज्या बातम्या

"दोन महिन्यांनी ना मोदी सत्तेत राहणार, ना फडणवीस", संजय राऊतांनी डागली तोफ

Published by : Naresh Shende

"पायाखालची वाळू सरकली की, माणूस दहशतवादाचा मार्ग स्विकारतो. माणूस घाबरला, पराभवाची भीती वाटायला लागली की, लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत. याचं भय वाटायला लागलं की, मग तो मोदींचा मार्ग सुरु होतो. धमक्या द्यायच्या, पोलिसांचा वापर करायचा. तुम्हाला धमक्या नवीन असतील, आम्ही धमक्या देतो सुद्धा, धमक्या घेतो सुद्धा. धमक्यांचा प्रकार या भागात चालला आहे, हा डरपोकपणा आहे. धमक्या समोरून कुणी देत नाही. आवाज बदलून, पण महाराष्ट्रला अशा धमक्या देणाऱ्यांची काळजी नाही. तुम्ही बारामतीत धमक्या द्याल. तुमचं अस्तित्व फार कमी आहे. दोन महिन्यांनी ना मोदी सत्तेत राहणार, ना फडणवीस. हे काम न केल्यामुळे पक्ष फोडून सत्तेत आले आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी महायुती सरकारवर तोफ डागली.

राऊत माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, तुम्हाला मुंबईत यायचं आहे, हे लक्षात ठेवा. मुंबईला यायचंय, ठाण्याला यायचंय, रस्ता आमचाच आहे. पवार साहेबांच्या माणसाला धमक्या देताय की शिवसैनिकांना धमक्या देताय, आम्ही घाबरणारे लोक नाहीत, ही मर्दांची सभा आहे. हर्षवर्धन पाटलांची अस्वस्थता आम्हाला कळते. भाजपमध्ये फक्त दोघांनाच शांत झोप लागते. अच्छे दिन आम्हाला नको, अच्छे दिनसाठी तुम्ही आता मैदानात उतरा. दुधाला भाव नाही, पण गद्दारांना भाव आहे.

अजित पवारांशिवाय बारामतीचं काहीही अडलं नाहीय. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. जे गेले ते गेले, आपण त्यांच्याशिवाय पुढे जात आहोत. लोकांना वाटतं पवार साहेब अजूनही कृषीमंत्री आहेत. गद्दार आमदार ५०-१०० कोटी रुपये घेत आहेत. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पुढच्या दोन महिन्यात भाजप शिल्लक राहतोय का ते पाहाच, असंही संजय राऊत म्हणाले.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा