उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
शिवतीर्थवर स्नेहभोजनासाठी या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, "आमरस पुरी खायला गेलेलं. कॅफे आहे ना तो. काल आमरस पुरीचा बेत होता. यासोबतच शिवसेना मनसे युतीबाबत सुरु असलेल्या चर्चांवर संजय राऊत म्हणाले की, युती झाल्यावरती बोलू, देवेंद्र फडणवीस काय ठरवतात त्याच्यावर आहे." असे संजय राऊत म्हणाले.