राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्याने अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. शिवभोजन थाळीसह इतर योजना बंद करण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
जवळपास एक लाख कोटी रुपयांची तूट भरुन काढण्यासाठी अनेक योजना बंद कराव्या लागणार आहेत. आगामी अर्थसंकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या विभागानिहाय बैठकामध्ये या योजना बंद करायच्या का याची ही चाचपणी सुरु आहे. याचपार्श्वभूमिवर संजय राऊत यांनी अंदानी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, "शिवभोजन थाळी ही आधीच्या सरकारनं गोर-गरीब जनतेसाठी सुरु केली होती. लाडका भाऊ आणि इतर योजना याच सरकारच्या योजCना सरकारच्या आहेत. ज्या योजना एकनाथ शिंदे यांच्या योजना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून बंद करत आहेत. शिवभोजण थाळी सुरू केली तेव्हा उद्धव ठाकरे सरकार मध्ये होते आणि एकनाथ शिंदे मंत्री होते".
"त्या योजनेचे एकनाथ शिंदेंनी उद्घाटन केले आहे. गरिबांच्या योजना बंद का आणि अदानींच्या योजना सुरू का यावर त्यांनी बोलायला हव. गरिबांच्या योजना का बंद होतात हा प्रश्न सरकारमधील लोकांनी मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हणाले आहे".