उद्धव ठाकरेंची शिवसेनाचे खासदार संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीबद्दल भाष्य केले आहे. काल आमदारांची बैठक पार पडली असून आज खासदारांची बैठक झाली. उद्यापासून अधिवेशन सुरु आहे. त्यासाठी योग्य दिशा मिळावी यासाठी बैठक आयोजित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आता विधानसभेतील विरोधी पक्षावरदेखील हक्क सांगणार आहे. आमची आमदार संख्या कमी असली तरीही आम्ही विरोधी पक्षावर हक्क सांगणार आहोत. याआधीही आमदार संख्या कमी असताना विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. विधानसभा अध्यक्ष आमची भूमिका मान्य करतील.असेही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांनी नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये जी कामं झाली असे सांगितले पण ती कामे खरं तर झालीच नाहीत. तो भ्रष्टाचार होता. शिंदे यांचे सरकार असताना आरोग्य मंत्री कोण होतं आणि त्यांच्या कार्यकाळात किती घोटाळे झाले याबद्दल सगळ्यांनाच कल्पना आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हा सर्व भ्रष्टाचार थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ते हा सगळा भ्रष्टाचार पुढेही थांबवणार असतील आणि याआधीचा भ्रष्टाचार कसा झाला हे जनतेसमोर आणणार असतील तर आम्ही त्यांचे नक्कीच स्वागत करु".
यादरम्यान संजय राऊत यांनी माणिकराव कोकाटे यांच्याबद्दलही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, "माणिकराव कोकाटे हे कायद्याने अपात्र ठरले आहेत. सध्या त्यांची मंत्रिपद वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. सुनील केदारे यांनी 24 तासांच्या आत आमदारकी गेली. तसेच उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्येही राहुल गांधींवरही तीच वेळ आली होती. मात्र माणिकराव कोकाटे यांना संधी दिली जाते. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
रामदास कदम यांनी उध्वस्त करण्याचे भाषा केली हे त्यांचे ध्येय आहे, तसे प्रयत्न त्यांनी करावे. आमच्यात ही बळ आहे. दिल्लीच्या मोगलाई बरोबर हातमिळवणी करून सत्ता स्थापन करवी. मात्र या सर्वांना एकदिवस मातोश्रीच्या दारात यावे लागेल. हे माझं भाकीत नाही तर दावा आहे असं समजा असा घणाघात ही खासदार संजय राऊतांनी यावेळी केलाय.