ताज्या बातम्या

पनवेल मध्ये शिंदे गट आणि भाजप युती होणार? शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची जोरदार मोर्चेबांधणी

शिंदे गटासोबत गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदावर नियुक्ती राज्यभर सुरू आहे. पनवेलमध्येदेखील शिंदे गटात गेलेल्या रामदास शेवाळे व प्रथमेश सोमण, परेश पाटील, रुपेश ठोंबरे मनसे मधून दाखल झालेले अतुल भगत यांची महत्त्वाच्या पदांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्ती केली आहे. पनवेलमध्ये नव्याने मोर्चेबांधणीचे काम शिंदे यांनी हाती घेतले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

हर्षल भदाणे पाटील, पनवेल

शिंदे गटासोबत गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदावर नियुक्ती राज्यभर सुरू आहे. पनवेलमध्येदेखील शिंदे गटात गेलेल्या रामदास शेवाळे व प्रथमेश सोमण, परेश पाटील, रुपेश ठोंबरे मनसे मधून दाखल झालेले अतुल भगत यांची महत्त्वाच्या पदांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्ती केली आहे. पनवेलमध्ये नव्याने मोर्चेबांधणीचे काम शिंदे यांनी हाती घेतले आहे. राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुंबई येथील रत्नसिंधू बंगल्यावर पनवेल व उरण जिल्ह्याच्या मुख्य पदाधिकाऱ्यांना पदाचे लेखी पत्र देऊन मोर्चेबांधणीचे काम सुरू केले. यावेळी रामदास शेवाळे यांना पक्षाने पनवेल जिल्ह्याचा संपर्क नेता म्हणून पद दिले आहे.

शेवाळे यांच्यासोबत पनवेलच्या महानगरपालिका क्षेत्रासाठी अॅड. प्रथमेश सोमण यांना पदभार पक्षाने सोपविला आहे. रूपेश ठोंबरे यांच्याकडे पक्षाने तालुकाप्रमुख ही जबाबदारी दिली असून माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य परेश पाटील यांना पनवेलच्या ग्रामीण परिसरासाठी उपजिल्हा प्रमुख नेमण्यात आले आहे. ग्रामीण पनवेलची जबाबदारी परेश पाटील यांना देण्यात आली आहे. मुंबई येथील पदवाटप करण्याच्या कार्यक्रमावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे शिंदे गटाचे सचिव संजय मोरे, आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते.

पनवेल मध्ये शिंदे गट आणि भाजप युती होणार ?

सद्या पनवेल मध्ये निवडणुकीचे वारं वाहत आहे. पनवेल महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आखणी करत आहेत. त्यात शिंदे गट सुधाऊ मागे नाही. शिंदे गटाने पनवेल, उरण, रायगड मधील पदाधिकाऱ्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र राज्यात ज्या पद्धतीने शिंदे गट आणि भाजप युतीचे सरकार स्थापन झाले तशीच पनवेल मनपा निवडणुकीत शिंदे गट आणि भाजमध्ये युती होणार अश्या चर्चा जोर रंगु लागल्या आहेत. पनवेल महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गट स्थानिक पातळीवर भाजपसोबत युती होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पालिकेत शिवसेनेचा एकही नगरसेवक मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आला नव्हता. त्यामुळे शिदे गटातील पदाधिकाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र मनपा निवडणुकीत युती होते का हे येणारा काळच ठरवेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते