पुण्याच्या मावळमध्ये कुंडमळा पूल कोसळला. त्यात 4 जणांचा मृत्यू झाला. मात्र हा पूल 30 वर्षांपूर्वीचा होता. तो धोकादायक पुलांच्या यादीतही टाकलेला होता. माग या पुलावर पर्यटक गेले कसे? आणि या पुलाच्या बांधकामाकडे इतकी वर्ष दुर्लक्ष का झालं? हे खरे जळजळीत प्रश्न आहेत. पाहूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट वाचा.
पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे पूल कोसळला. त्यात 4 जणांचा बळी गेला असून यामध्ये अनेक लोक जखमी झाले. त्यामुळे महाराष्ट्र हादरून गेला. जीर्ण झालेला हा पूल कोसळल्यानंतर प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
स्थानिकांनी आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की, "2024 सालीच पुलाच्या दुरुस्तीसाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र आता संजय राऊतांनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यात अवघ्या 80 हजारांची तरतूद केल्याचा दावा आहे. सोबतच पालकमंत्री म्हणून अजित पवारांनरही त्यांनी ताशेरे ओढलेत."