ताज्या बातम्या

'काँग्रेसची सत्ता आल्यास जेलभरोची सुरुवात चंद्रपूरहून करणार' वडेट्टीवारांच्या टीकेला मुनगंटीवारांचं उत्तर

Published by : shweta walge

भाजपने विरोधी पक्षांवर सूडबुद्धीने कारवाया केल्या. काँग्रेसची सत्ता आल्यास जेलभरोची सुरुवात चंद्रपूरहून करणार असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मूल शहरात आयोजित काँग्रेस प्रचारसभेत दिला होता. यावरच भाजपचे लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आता त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

ते म्हणाले की, वडेट्टीवार यांचा इशारा आपल्याकडे नसून काँग्रेस पक्षातीलच प्रतिस्पर्ध्यांवर आहे. कारागृहात टाकण्यासाठी कारण आणि पुरावे लागतील त्यामुळे त्यांचे संकेत माझ्याकडे नाहीत असे मुनगंटीवार यांनी ठासून सांगितले आहे.

दरम्यान, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. तर काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोकर यांच्या पत्नी व आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

हरियाणात भाविकांच्या बसला भीषण आग

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशी स्थगित