धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांचे पीए धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनंजय मुंडे यांनी राजीनामा सोपवला असून मुख्यमंत्र्यांनी मुंडेंचा राजीनामा स्विकारला आहे. याच पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडे यांनी ट्विट करत सांगितले की, काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.
यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांचं ट्विट आलं आहे. माननीय आदरणीय भुजबळ साहेब आणि पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे स्टेटमेंट असं आहे की, नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिलेला आहे. हे जे धनंजय मुंडे यांचे ट्विट आलेलं आहे. त्यामध्ये नैतिकतेचा न पण दिसत नाही आहे. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या तब्येतीमुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे. असं त्यांचे ट्विट आलेलं आहे. नैतिकता म्हणून हा राजीनामा दिला आहे की स्वत:च्या तब्येतीमुळे राजीनामा दिला आहे?
हे भयानक आहे. आज 84 दिवस झाले. जी चार्जशीट दाखल झाली ती सरकारने आधी पाहिलीच असणार ना. जर हे फोटो पाहिले असतील तर 84 दिवस लागले या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला आणि हे मंत्री म्हणतात मी आजारी आहे म्हणून राजीनामा दिलाय. हीच ती नैतिकता. धनंजय मुंडे आणि नैतिकता कधी भेटलेच नाही. वाल्मिकला VIP ट्रिटमेंट हे होतेच कसे? आज या राज्यात चाललंय तरी काय? सुरेश धसांनी आरोप केला त्यांचे स्पष्टीकरण हे आम्हाला मिळालंच पाहिजे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.