बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
यातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे. यातच फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये बघितल्याचा दावा तिथल्या स्थानिकांनी केला होता. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला बघितल्याचा काही लोकांनी दावा केला होता.
नाशिक पोलिसांच्या टीमने परिसरात येऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करत ओळख पटवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू होता. याच पार्श्वभूमीवर सीसीटीव्हीत दिसलेला तो व्यक्ती कृष्णा आंधळे नसल्याचे स्पष्टीकरण नाशिक पोलिसांनी दिलं आहे.