ताज्या बातम्या

Uddhav Thackeray : भाडोत्री जनता पक्षानं आपलं सरकार गद्दारी करायला लावून पाडलं

Published by : Siddhi Naringrekar

गुहागरमधून उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, कोकण माझ्या हक्काचं आहेच. कोकण आपलंच आहे. अनेकदा असं होते कामाच्या वेळेला आपण घरच्यांना विसरतो. मात्र माझं तसं नाही. भारतीय जनता पक्षाची संस्कृती आता बाहेर आलेली आहे. आम्हीच 20- 30 वर्ष एका हिंदुत्वाच्या वेडापायी हे जिथे नव्हते तिथे खांद्यावरती घेऊन फिरलो. शिवसेनेनं जर त्यांना खांदा दिला नसता तर आता यांना खांदा द्यायला लोक उरली असती का? भास्कर जाधव तुम्ही एकटं नाहीत. संपूर्ण शिवसेना तुमच्यापाठी आहे. ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळी मी काय काय केलं हे तुमच्यासमोर आहे. विनायक राऊत खासदार झालं नसते तर कोकणात गुंडगिरी वाढली असती.

भाडोत्री जनता पक्षानं माझा पक्ष फोडला. भाडोत्री जनता पक्षानं आपलं सरकार गद्दारी करायला लावून पाडलं. गद्दार गेलं. मला स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचं नव्हते. पण संपूर्ण देशात बाकीचं जर का पक्ष पाहिलं तर त्यांचा नेता पहिला मुख्यमंत्री होतो. कोणाच्या पाठीत तुम्ही वार केला. उद्धव ठाकरेंच्या केला. जर शिवसेना ही चार अक्षर त्यांच्या पाठिमागे लागली नसती तर कधीतरी तुम्ही त्यांना विचारला असतं? भाजपाचे हे नासलेले हिंदुत्व आहे. आमच्या हिंदुत्वात ओव्या, तुमच्या हिंदुत्वात शिव्या असतील. आज उद्धव ठाकरेंना तुम्ही संपवायला निघालात. माझं नाव, चिन्ह, वडील चोरलंत. विदर्भात गेल्यावर शिवसैनिक मला येऊन सांगतात, उद्धवजी यावेळी आपली लाट आहे आणि मोदी सरकारची विल्हेवाट आहे. भ्रष्टाचारी अभय योजना अशी मोदींनी नवीन योजना काढली आहे.

शिवसैनिक आजही माझ्यासोबत आहेत. अटलजींचा पक्ष खरा होता, आता भाडोत्री जनता पक्ष. सरकारकडून 10 वर्ष फक्त आश्वासनं. इथून सगळं गुजरातला नेत आहेत. मोदीजी तुम्ही देशाचं पंतप्रधान की फक्त गुजरातचं पंतप्रधान हेच कळत नाही आहे. पंतप्रधान मोदींनी 10 वर्षात काय केलं? आता आपण आपल्या हक्काचा इंडिया आघाडीचा पंतप्रधान बसवणार आहोत. 400 पारचं डाव त्यांचे एवढ्यासाठी आहेत की त्यांना घटना बदलायची आहे. त्यांचे ते डाव आहेत. हुकूमशाही आणण्याचा यांचा डाव आहे.

जे त्यांच्या विरोधात बोलतील त्यांना सरळ देशद्रोही म्हणून तुरुंगात टाकलं जातं. तुम्ही भाजपात या नाहीतर जेलमध्ये जा. भाजपा सगळीकडे द्वेष पसरवत आहेत. भाडोत्री पक्षाचा रोजच शिमगा चालू आहे. त्यांना काय बोंबलायचे आहे ते बोंबलू दे. मात्र आपला शिमगा आता येत आहे. तो शिमगा नुसता बोंबलून नाही साजरा करायचा तर त्या होळीमध्ये हुकूमशाहीची होळी करायची आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत घोषणा देणाऱ्या तरुणाने घेतली शरद पवार यांची भेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले...

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद

Shambhuraj Desai : 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या मताधिक्याने माननीय नरेश म्हस्के साहेब निवडून येतील

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा