ताज्या बातम्या

Mumbai Rain Update : ढगांच्या गडगडाटांसह पावसाला सुरूवात! अवकाळी पावसाचा लोकल सेवेवर फटका

मुंबई पाऊस अपडेट: ढगांच्या गडगडाटांसह पावसाची सुरूवात, लोकल सेवेवर तांत्रिक अडचणींमुळे उशीर.

Published by : Prachi Nate

मुंबईच्या काही भागात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईमध्ये कडाक्याच्या उन्हाचा त्रास नागरिकांना होत होता मात्र आता मुंबईत वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून होणारा त्रास कमी होईल.

हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर अचानक आलेल्या पावसाचा फटका लोकलने प्रवास करणाऱ्यांना बसला आहे. तांत्रिक कारणामुळे लोकल सेवा उशिराने धावत आहेत. तसेच पनवेल ते सीएसएमटी लोकल उशिराने धावत आहेत. जोरदार वारे आणि पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे, तर नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. हवामान खात्याने पुढील काही तासांमध्ये अधिक पावसाचा इशारा दिला आहे.

महामुंबई परिसराला 6 ते 8 मे दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अंतर्गत भागात पावसासह गारपिटीची शक्यता आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांनी दिली. पुढील तीन दिवस राज्यासह मुंबईत पावसामुळे तापमानात किंचित घट होईल, असेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे मुंबईचे कमाल तापमान गेल्या काही दिवसांपासून 33 आणि 34 अंश सेल्सिअस दरम्यान स्थिर असले, तरी आर्द्रता अधिक नोंदविली जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Accident : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात अपघात

Weather Update : पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Latest Marathi News Update live : राज्यपाल आचार्य देवव्रत छत्रपती शिवाजी पार्कमध्ये