Accident
Accident

Accident : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात अपघात

लोखंडी सळई भरलेल्या ट्रकने कारला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघात
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात अपघात

  • लोखंडी सळई भरलेल्या ट्रकने कारला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघात

  • अपघातामुळे महामार्गावर दोन तास वाहतूक खोळंबली

(Accident ) सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला. अजिंठा घाटात भरधाव लोखंडी सळई भरलेल्या ट्रकने कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल.

या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर फर्दापूरजवळ अजिंठा घाटात ही घटना घडली.

अपघातात कार ट्रकखाली दबली गेली.अपघातामुळे महामार्गावर दोन तास वाहतूक खोळंबली होती. क्रेनच्या साहाय्याने ट्रक व गाडीला बाजूला घेतले गेले. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com