ताज्या बातम्या

Mahadevi elephant : महादेवी हत्तीणीच्या पुढच्या पायाला फ्रॅक्चर; वनतारा पशुवैद्यकीय तज्ञांची माहिती

वनतारा नॅशनल पार्कमध्ये राहणाऱ्या प्रसिद्ध हत्तीणी महादेवीच्या प्रकृतीसंदर्भात चिंताजनक माहिती समोर आली आहे. तिच्या पायाला फ्रॅक्चर असल्याचे निदान पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

Published by : Prachi Nate

वनतारा नॅशनल पार्कमध्ये राहणाऱ्या प्रसिद्ध हत्तीणी महादेवीच्या प्रकृतीसंदर्भात चिंताजनक माहिती समोर आली आहे. तिच्या पुढच्या पायात फ्रॅक्चर असल्याचे निदान वनतारा येथील पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. या दुखापतीमुळे महादेवीलाही आता भरपूर विश्रांती, आराम आणि काळजीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

महादेवीच्या पायात दीर्घ काळापासून नखांचे फोड होते, ज्यामुळे तिला चालताना त्रास जाणवत होता. या फोडांमुळे संक्रमणाची शक्यता वाढली असून, त्यावर उपचार सुरू आहेत. यासोबतच तिच्या दोन्ही गुडघ्यांवर वेदनादायक सूज असल्याचेही पशुवैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. ही सूज आणि फोड या दोन गोष्टींमुळे तिच्या हालचाली मर्यादित झाल्या आहेत.

महादेवीच्या उपचारासाठी वनतारा प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेतली असून, तिला शांत आणि सुरक्षित वातावरणात ठेवले जात आहे. तिच्या आहारातही विशेष बदल करण्यात आले असून, औषधोपचार सुरू आहेत. सध्या तिच्या प्रकृतीवर सतत देखरेख ठेवण्यात येत असून, पुढील काही दिवस ती विश्रांतीत असणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

IND vs ENG Mohammed Siraj : डीएसपी सिराजचा अनोखा पराक्रम! सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम मागे टाकत केली ऐतिहासिक कामगिरी

Red Soil Story : कोकणातील 'त्या' युट्यूबरचे निधन, स्टोरी टाकत दिली माहिती

Latest Marathi News Update live : अत्याचार प्रकरणात प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप, 5 लाखांचा दंडही ठोठावला

Tuljapur Temple : श्री तुळजाभवानी मंदिरातून शस्त्रपूजनातील तलवार गायब, उडाली एकच खळबळ