ताज्या बातम्या

Vinayak Raut : समोर कोण उमेदवार आहे याच्या काळजीत अजिबात नाही

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. ठाकरे गटाकडून सिंधुदुर्ग- रत्नागिरीमधून खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विनायक राऊत म्हणाले की, 16 एप्रिलला या दिवशी उमेदवारी अर्ज रत्नागिरी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहे.

यासोबतच ते म्हणाले की, प्रचाराचा वेग खूप उत्साहवर्धक आहे, आनंददायी आहे. शिवसेनेसहीत आघाडीचे सर्वच पक्ष हिरहिरीने, उत्साहाने प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय हा अडीच लाखांच्या मताधिक्याने मिळवायचाच हा निर्धार करुन सर्वजण कामाला लागलेले आहेत. मी समोर कोण उमेदवार आहे याच्या काळजीत अजिबात नाही आहे. कोणीही येवो आपल्याला लढायचे आहे, आणि प्रचंड मताधिक्याने जिंकायचं आहे.

हा आत्मविश्वास मनामध्ये ठेऊन आपण कामाला लागलेलो आहोत. आव्हान समजूनच आम्ही कामाला लागतो. कोणीही उमेदवार येवो ही आपली निवडणूक अत्यंत कठोर परिश्रम घेऊन आपल्याला लढवायची असते आणि त्यानंतरच जिंकता येते. येणारा कोणी जरी असला तो आपला प्रतिस्पर्धी आहे हे समजून आम्ही कामाला लागतो. असे विनायक राऊत म्हणाले.

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री