लोकशाही स्पेशल

दिनविशेष 10 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 10 February 2024 : सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 10 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००५: उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.

१९९६: आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या डीप ब्लू या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.

१९४९: गांधी-वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली.

१९४८: पुणे विद्यापीठाची स्थापना.

१९३३: न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.

१९३१: भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.

१९२९: जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.

१९२३: टेक्सास टेकनॉलोजिकल कॉलेज सध्याचे टेक्सास टेक विद्यापीठाची स्थापना केली.

आज यांचा जन्म

१९४५: राजेश पायलट - केंद्रीय मंत्री (निधन: ११ जून २०००)

१९२२: अरपॅड गॉन्कझ - हंगेरी देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: ६ ऑक्टोबर २०१५)

१९१०: दुर्गाबाई भागवत - जेष्ठ लेखिका, तत्त्ववेत्या (निधन: ७ मे २००२)

१८९४: हॅरॉल्ड मॅकमिलन - इंग्लंडचे पंतप्रधान (निधन: २९ डिसेंबर १९८६)

१८०३: नाना शंकर शेटे - आधुनिक मुंबईचे शिल्पकार (निधन: ३१ जुलै १८६५)

आज यांची पुण्यतिथी

२०२३: गौतम शोम (सीनियर) - भारतीय क्रिकेट खेळाडू (जन्म: २८ मे १९५८)

२०१२: लॉईड मॉरिसन - एच. आर. एल. मॉरिसनचे संस्थापक (जन्म: १८ सप्टेंबर १९५७)

२००१: मोगुबाई कुर्डीकर - जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका, गानतपस्विनी - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म: १५ जुलै १९०४)

१९८२: नरहर कुरुंदकर - विद्वान, टीकाकार आणि लेखक (जन्म: १५ जुलै १९३२)

१९१२: सर जोसेफ लिस्टर - निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बऱ्या होतात हे सिध्द करणारे ब्रिटिश शल्यविशारद (जन्म: ५ एप्रिल १८२७)

१८७१: एटिनी कॉन्स्टन्टाईन डी गर्ल - बेल्जियमचे पहिले पंतप्रधान (जन्म: २६ डिसेंबर १७८५)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते