5 July 2023 Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

5 July 2023 Dinvishesh : 5 जुलै दिनविशेष, जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

5 July 2023 Dinvishesh : सध्या जुलै महिना सुरू झाला आहे. तर जुलै महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत....

Published by : Sagar Pradhan

Dinvishesh 5 July 2023 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 5 जुलै या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं

२०१२: द शर्ड, लंडन - ३१० मीटर (१०२० फूट) उंचीसह ही युरोपमधील सर्वात उंच इमारत ठरली.

२००९: रॉजर फेडरर - यांनी विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.

२००४: इंडोनेशिया - पहिली अध्यक्षीय निवडणूक झाली.

२००३: SARS रोगराई उद्रेक - जागतिक आरोग्य संघटनेने हि रोगराई संपली असे घोषित केले.

१९९७: मार्टिना हिंगीस - स्वित्झर्लंडच्या १६ वर्षाच्या टेनिस खेळाडूने विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकली.

१९९६: ए. पी. जे. अब्दुल कलाम - यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर.

१९९६: एन. पंत - यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर.

१९९६: डॉली मेंढी - प्रौढ पेशीपासून क्लोन केलेला पहिला सस्तन प्राणी बनला.

१९९४: ऍमेझॉन - कंपनीची सुरवात.

१९८०: ब्योर्न बोर्ग - सलग पाच वेळा विम्बल्डन जिंकणारे पहिले व्यक्ती बनले.

१९७७: पाकिस्तान - देशामध्ये लष्करी उठाव.

१९७५: केप व्हर्डे - देशाला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९७५: आर्थर एशे - विम्बल्डन टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद जिंकणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती बनले.

१९७५: केप वर्दे - देशाला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९७१: अमेरिकी - देशात मतदानाचे वय २१ वरून १८ वर्षे करण्यात आले.

१९६२: अल्जीरीया - देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले

१९५४: आंध्रप्रदेश उच्च न्यायालय - स्थापना.

१९५४: ब्रिटिश ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन (BBC) - पहिले दैनिक टेलिव्हिजन न्यूज बुलेटिन प्रसारित केले.

१९५०: इस्रायल - देशाने जगातील ज्यू व्यक्तीला इस्रायलमध्ये राहण्याचा हक्क दिला.

१९५०: कोरियन युद्ध - ओसानची लढाई: अमेरिकन आणि उत्तर कोरियाच्या सैन्यात प्रथम संघर्ष सुरु] झाला.

१९४६: फ्रान्स फॅशन शोमध्ये पदार्पण केल्यानंतर बिकिनीची विक्री सुरु.

१९४३: दुसरे महायुद्ध - कुर्स्कची लढाई: ऑपरेशन सिटाडेल, जर्मन सैन्याने सोव्हिएत युनियनविरूद्ध मोठ्या प्रमाणात आक्रमण सुरू केले.

१९४१: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन बार्बरोसा: जर्मन सैन्य नीपर नदी पर्यंत पोहोचले.

१९४०: दुसरे महायुद्ध - फ्रान्स आणि युनायटेड किंगडम यांच्यामधील परकीय संबंध संपले.

१९१६: श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ (SNDT Women's University), पुणे - महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.

१९१३: गंधर्व नाटक मंडळी - ची स्थापना बालगंधर्वांनी यांनी केली.

१९०५: लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.

१८८४: जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.

१८४१: थॉमस कुक - यांनी लेस्टर ते लोफबरो अशी पहिली सहल आयोजित केली.

१८३०: फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.

१८११: व्हेनेझुएला - देशाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१६८७: फिलोसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका - सर आयझॅक न्यूटन यांनी हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.

आज यांचा जन्म

१९६८: सुसान वॉजिकी - युट्युबचे मुख्य कार्यकारी अधिकारी

१९६०: राकेश झुनझुनवाला - भारतीय गुंतवणूकदार आणि स्टॉक ट्रेडर, आकासा एअरचे संस्थापक (निधन: १४ ऑगस्ट २०२२)

१९५४: जॉन राइट - न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक

१९५२: रेणू सलुजा - चित्रपट संकलक - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: १६ ऑगस्ट २०००)

१९४६: रामविलास पासवान - भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री, खासदार

१९३३: एस. के. भगवान - भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक (निधन: २० फेब्रुवारी २०२३)

१९२५: नवल किशोर शर्मा - भारतीय राजकारणी, गुजरातचे राज्यपाल (निधन: ८ ऑक्टोबर २०१२)

१९२०: आनंद साधले - साहित्यिक (निधन: ४ एप्रिल १९९६)

१९१८: के. करुणाकरन - केरळचे ५वे मुख्यमंत्री (निधन: २३ डिसेंबर २०१०)

१८८२: हजरत इनायत खान - हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक (निधन: ५ फेब्रुवारी १९२७)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: पी. गोपीनाथन नायर - भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य कार्यकर्ते - पद्मश्री, जमनालाल बजाज पुरस्कार (जन्म: ७ जुलै १९२२)

२००६: थिरुल्लालु करुणाकरन - भारतीय कवी आणि विद्वान (जन्म: ८ ऑक्टोबर १९२४)

२००५: बाळू गुप्ते - भारतीय क्रिकेट खेळाडू (जन्म: ३० ऑगस्ट १९३४)

१९९६: बाबूराव अर्नाळकर - रहस्यकथाकार

१९५७: अनुग्रह नारायण सिन्हा - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: १८ जून १८८७)

१९४५: जॉन कर्टिन - ऑस्ट्रेलियाचे १४वे पंतप्रधान

१८३३: निसेफोरे नाऐप्से - फोटोग्राफीचे शोधक (जन्म: ७ मार्च १७६५)

१८२६: सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स - सिंगापूरचे संस्थापक (जन्म: ६ जुलै १७८१)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj & Uddhav Thackeray Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी