Annabhau Sathe Death Anniversary : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले. साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ठ कांदबरीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचे ‘माझी मैना’ हे मुंबईबद्दल लिहिलेलं गीत आजही अजरामर आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त हे स्टेटस ठेवून अभिवादन करा.
समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान, लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पुर्ननिर्माण अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस.
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
सागराचे पाणी कधी आटणार नाही, अण्णाभाऊ तुमची आठवण कधी मिटणार नाही
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते, धुळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन