लोकशाही स्पेशल

दिनविशेष 10 जानेवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 10 January 2024 : सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 10 जानेवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: पहिले डुक्कर ते मनुष्य हृदय प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आले.

१९७२: पाकिस्तान मधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देशमध्ये परतले.

१९६६: भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.

१९२९: जगात अमाप लोकप्रियता मिळालेले द अॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.

१९२६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.

१९२०: पहिले महायुद्ध व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.

१८७०: जॉन डी. रॉकफेलर यांनी स्टँडर्ड ऑईल कंपनीची स्थापना केली.

१८६३: चार्ल्स पिअर्सन यांच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.

१८०६: केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.

१७३०: पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.

१६६६: सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.

आज यांचा जन्म

१९७४: ह्रतिक रोशन - भारतीय अभिनेता

१९५०: नाजुबाई गावित - आदिवासींसाठी आयुष्य वेचणाऱ्या

१९४५: जॉन मेसन - भारतीय शिक्षणतज्ञ (निधन: १७ फेब्रुवारी २०२३)

१९४०: के जे. येसूदास - पार्श्वगायक व संगीतकार

१९३७: मुरली देवरा - भारतीय राजकारणी (निधन: २४ नोव्हेंबर २०१४)

१९३०: लेखकबासु चटर्जी - भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा (निधन: ४ जून २०२०)

१९०१: डॉ. गणेश हरी खरे - इतिहास संशोधक

१९००: मारोतराव कन्नमवार - महाराष्ट्राचे २रे मुख्यमंत्री (निधन: २४ नोव्हेंबर १९६३)

१८९६: दिनकर गंगाधर केळकर - वास्तुसंग्राहक (निधन: १२ जानेवारी १९६६)

१७७५: बाजीराव पेशवे (दुसरे) - (निधन: २८ जानेवारी १८५१)

आज यांची पुण्यतिथी

२००२: पं. चिंतामणी व्यास - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४)

१९९९: श्रीपाद कृष्ण केळकर - स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत

१९९७: अलेक्झांडर आर. टॉड - स्कॉटिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: २ ऑक्टोबर १९०७)

१९९४: गिरिजाकुमार माथूर - हिंदी कवी (जन्म: २२ ऑगस्ट १९१९)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य

Home Loan Intrest Rate : गृहकर्जदारांना दिलासा ! PNB, Indian Bank आणि Bank Of India ने केली व्याजदरात कपात

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'