लोकशाही स्पेशल

दिनविशेष 11 जुलै 2023 : जागतिक लोकसंख्या दिन, जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या जुलै महिना सुरू झाला आहे. तर जुलै महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 11 July 2023 : सध्या जुलै महिना सुरू झाला आहे. तर जुलै महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 11 जुलै या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं

जागतिक लोकसंख्या दिन

२०२१: रिचर्ड ब्रॅन्सन - हे त्याच्या व्हर्जिन गॅलेक्टिक अंतराळयानाद्वारे अंतराळात जाणारे पहिले सामान्य नागरिक बनले.

२००६: मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट - भारतात मुंबई येथे झालेल्या लोकल ट्रेनच्या बॉम्ब हल्ल्यांच्या मालिकेत २०९ लोकांचे निधन.

१९७३: व्हेरिग फ्लाइट ८२० च्या अपघातात १२३ लोकांचे निधन, त्यामुळे विमानाच्या शौचालयात धूम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली.

१९५०: पाकिस्तान - आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा (IMF) सदस्य बनला.

१९०८: लोकमान्य टिळक - यांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली.

१८९३: कोकिची मिकीमोटो यांनी पहिला कल्चर्ड मोती मिळवला.

१८०१: पॉन धूमकेतू - फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉनयांनी या धूमकेतूचा शोध लावला.

१६५९: मराठा साम्राज्य - अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी शिवाजी राजे राजगडवरून निघून प्रतापगड येथे पोचले.

आज यांचा जन्म

१९६७: झुम्पा लाहिरी - भारतीय-अमेरिकन कादंबरीकार आणि लघु कथालेखक

१९५६: अमिताव घोष - भारतीय-अमेरिकन लेखक आणि शैक्षणिक

१९५३: सुरेश प्रभू - भारतीय राजकारणी

१९२३: तुन तुन - भारतीय अभिनेत्री आणि कॉमेडियन (निधन: २४ नोव्हेंबर २००३)

१९२१: शंकरराव खरात - दलित साहित्यिक (निधन: ९ एप्रिल २००१)

१८९१: परशुराम कृष्णा गोडे - प्राच्यविद्या संशोधक (निधन: २८ मे १९६१)

१८८९: नारायण हरी आपटे - कादंबरीकार, चित्रपट कथालेखक (निधन: १४ नोव्हेंबर १९७१)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: के. रामराज - भारतीय अभिनेते

२०२२: के. एन. ससीधरन - भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते

२००९: शांताराम नांदगावकर - गीतकार (जन्म: १९ ऑक्टोबर १९३६)

२००३: सुहास शिरवळकर - कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक (जन्म: १५ नोव्हेंबर १९४८)

१९९४: मेजर रामराव राघोबा राणे - बॉम्बे सॅपर्सचे अधिकारी - परमवीर चक्र

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sharad Pawar : शिक्षक आंदोलनाला शरद पवार यांचा पाठिंबा; शासनाच्या उदासीनतेवर केली तीव्र शब्दांत टीका

Pune Crime : पुण्यात पोलिसांची धडक कारवाई! SPA सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु

Bin Lagnachi Gosht : प्रिया बापट-उमेश कामत पुन्हा एकदा झळकणार रुपेरी पडद्यावर; लवकरच दिसणार 'या' चित्रपटात

Latest Marathi News Update live : मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जातोय; उद्धव ठाकरेंची विधिमंडळ परिसरातून प्रतिक्रिया