Bin Lagnachi Gosht: प्रिया बापट-उमेश कामत पुन्हा एकदा झळकणार रुपेरी पडद्यावर
Bin Lagnachi Gosht: प्रिया बापट-उमेश कामत पुन्हा एकदा झळकणार रुपेरी पडद्यावर; लवकरच दिसणार 'या' चित्रपटात Bin Lagnachi Gosht: प्रिया बापट-उमेश कामत पुन्हा एकदा झळकणार रुपेरी पडद्यावर; लवकरच दिसणार 'या' चित्रपटात

Bin Lagnachi Gosht : प्रिया बापट-उमेश कामत पुन्हा एकदा झळकणार रुपेरी पडद्यावर; लवकरच दिसणार 'या' चित्रपटात

प्रिया-उमेश पुन्हा एकत्र: 'बिन लग्नाची गोष्ट' चित्रपटाची खास झलक, 12 सप्टेंबरला प्रदर्शित.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Priya Bapat And Umesh Kamat New Movie : मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि क्युट कपल प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तब्बल 12 वर्षांनंतर हे दोघं पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. 'बिन लग्नाची गोष्ट' या हटके नावाच्या आगामी मराठी चित्रपटातून हे दोघं प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून येत्या 12 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षक या जोडीला स्क्रीनवर पाहण्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ही प्रतिक्षा संपली असून नुकतंच चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. या पोस्टरमध्ये प्रिया आणि उमेश यांच्या भूमिकेची झलक पाहायला मिळते. एका बाजूला प्रिया मिश्कील हास्य करत, हाताची घडी घालून आत्मविश्वासाने उभी आहे, तर दुसऱ्या बाजूला उमेश हातात हार घेऊन आणि डोक्यावर मुंडावळ्या बांधून, जणू काही लग्नासाठी पूर्ण तयारीत दिसतोय. पण या दृश्यामागे काहीतरी वेगळं कथानक दडलंय, असं जाणवतं.

'बिन लग्नाची गोष्ट' ही फक्त प्रेमकथेपुरती मर्यादित नसून, नात्यांमधल्या गुंतागुंतीच्या धाग्यांना, समज-गैरसमजांना आणि विवाहसंस्थेच्या चौकटीबाहेरच्या नातेसंबंधांना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणारी कथा आहे. चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य सांगतात, "प्रिया आणि उमेशची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री नेहमीच खास असते. इतक्या वर्षांनी ते माझ्या चित्रपटातून एकत्र येणार असल्याचा मला आनंद आहे. या सिनेमाची कथा काळाच्या पुढची आहे आणि आजच्या तरुण पिढीच्या विचारांना स्पर्श करणारी आहे."

दिग्दर्शक आदित्य इंगळे यांच्या मते, "ही गोष्ट आहे प्रेमाची, परस्परांच्या मनात वर्षानुवर्षे साचलेल्या गाठी सोडवण्याची आणि नात्यांच्या अर्थाला नव्याने समजून घेण्याची. काही लोकांना यातून नवीन प्रश्न मिळतील, काहींना जुन्या प्रश्नांची उत्तरं मिळतील." ते पुढे सांगतात, "ही कथा हलक्याफुलक्या प्रसंगांतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि प्रत्येकाला त्यात आपला अंश सापडेल."

आता प्रिया-उमेशच्या या पुनर्मिलनाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 'बिन लग्नाची गोष्ट' ही केवळ प्रेमकथा नाही, तर आजच्या पिढीच्या विचारविश्वाचा आरसा आहे, असं म्हणायला हरकत नाही

हेही वाचा...

Bin Lagnachi Gosht: प्रिया बापट-उमेश कामत पुन्हा एकदा झळकणार रुपेरी पडद्यावर
Bollywood Crime News : अभिनेत्रीला मोठा धक्का! पर्सनल सेक्रेटरीला अफरातफरीच्या आरोपाखाली अटक
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com