लोकशाही स्पेशल

दिनविशेष 16 डिसेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 16 December 2023 : सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 16 डिसेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००६: अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी एका सोबत्यासोबत अंतराळयानाच्या बाहेर जाऊन ७ तास ३१ मिनिटात विद्युत प्रणालीची दुरुस्ती केली.

१९९१: पुर्वीच्या सोविएत संघराज्यातून (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.

१९८५: कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक फस्ट ब्रीडर रिऍक्टर राष्ट्राला समर्पित.

१९७१: पाकिस्तानने भारताविरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करली.

१९२८: मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली.

१९०३: मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.

१८५४: भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.

१७७३: अमेरिकन राज्यक्रांती बॉस्टन टी पार्टी.

१४९७: वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.

आज यांचा जन्म

१९१७: सर आर्थर सी. क्लार्क - विज्ञान कथालेखक व संशोधक (निधन: १९ मार्च २००८)

१८८२: जॅक हॉब्ज - इंग्लिश क्रिकेट खेळाडू (निधन: २१ डिसेंबर १९६३)

१७७५: जेन ऑस्टीन - इंग्लिश लेखिका (निधन: १८ जुलै १८१७)

१७७०: लुडविग व्हान बीथोव्हेन - कर्णबधिर संगीतकार (निधन: २६ मार्च १८२७)

आज यांची पुण्यतिथी

२००४: लक्ष्मीकांत बेर्डे - भारतीय अभिनेते (जन्म: २६ ऑक्टोबर १९५४)

२००२: बंडोपंत देवल - सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम

१९६०: चिंतामण गणेश कर्वे - मराठी कोशकार आणि लेखक (जन्म: ४ फेब्रुवारी १८९३)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या लोकांच्या कामानिमित्त मोठ्या व्यक्तींशी भेटीगाठी होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Nagpur Emergency landing : विमानाला पक्षी धडकल्यानं विमानाचं इमर्जन्सी लैंडिंग

CM Devendra Fadnavis : मराठा समाजाचा हिताचा तोडगा निघाला, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया