Dinvishesh 17 January 2024 : सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 17 जानेवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२००१: अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.
१९५६: बेळगाव, कारवार आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्यावेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्यासाठी घोषणा झाली.
१९४६: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.
१९४५: दुसरे महायुद्ध रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.
१९१२: रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहचले.
१७७३: कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले.
आज यांचा जन्म
१९३२: मधुकर केचे - साहित्यिक (निधन: २५ मार्च १९९३)
१९१८: कमाल अमरोही - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक आणि कवी (निधन: ११ फेब्रुवारी १९९३)
१९१८: सईद अमीर हैदर कमाल नक्कवी - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी (निधन: ११ फेब्रुवारी १९९३)
१९१७: एम. जी. रामचंद्रन - तामिळनडुचे ३रे मुख्यमंत्री, अभिनेते - भारतरत्न, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: २४ डिसेंबर १९८७)
१९०८: एल. व्ही. प्रसाद - चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (निधन: २२ जून १९९४)
१९०६: शकुंतला परांजपे - भारतीय समाजसेविका (निधन: ३ मे २०००)
१९०५: दत्तात्रय रामचंद्र कापरेकर - भारतीय गणितज्ञ
आज यांची पुण्यतिथी
२०२२: पंडित बिरजू महाराज - भारतीय कथ्थक नर्तक व गुरू - पद्म विभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: ४ फेब्रुवारी १९३८)
२०१४: सुचित्रा सेन - भारतीय बंगाली व हिंदी अभिनेत्री - पद्मश्री (जन्म: ६ एप्रिल १९३१)
२०१३: ज्योत्स्ना देवधर - मराठी व हिंदी लेखिका (जन्म: २७ फेब्रुवारी १९२६)
२०१०: ज्योती बसू - पश्चिम बंगालचे ७वे मुख्यमंत्री (जन्म: ८ जुलै १९१४)
२०००: सुरेश हळदणकर - गायक आणि अभिनेते
१९९५: डॉ. व्ही. टी. पाटील - ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक
१९८८: लीला मिश्रा - अभिनेत्री
१७७१: गोपाळराव पटवर्धन - पेशव्यांचे सरदार