लोकशाही स्पेशल

दिनविशेष 2 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 2 November 2023 : सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 2 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२०: बेबी शार्क डान्स - हा व्हिडिओ युट्युबवर सगळ्यात जास्त वेळा बघितलेला व्हिडिओ बनला.

२०१६: मेजर लीग बेसबॉल चॅम्पियनशिप - शिकागो कब्स यांनी १०८ वर्षानंतर विजय मिळवला. हा काळ इतिहासातील सर्वात जास्त काळ आहे.

२०००: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक - एक्सपेडिशन १ पोहोचले. या दिवसापासून आजपर्यंत, स्थानकावरील अंतराळात मानवी उपस्थिती अविरत आहे.

१९९०: BSkyB - ब्रिटीश सॅटेलाइट ब्रॉडकास्टिंग आणि स्काय टेलिव्हिजन पीएलसी विलीन होऊन तयार झाले.

१९८४: फाशीची शिक्षा - १६६२ नंतर अमेरिकेत फाशीची शिक्षा मिळणाऱ्या वेल्मा बारफिल्ड ह्या महिला बनल्या.

१९४७: ह्यूजेस H-4 हरक्यूलिस - या आतापर्यंतचे सर्वात मोठे स्थिर-विंग विमानाचे एकमेव उड्डाण करण्यात आले.

१९३६: ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) - जगातील पहिली नियमित व हाय-डेफिनिशन टेलिव्हिजन सेवा सुरू केली.

१९२०: पहिले व्यावसायिक रेडिओ स्टेश - अमेरिकेच्या KDKA ने प्रसारण सुरू केले.

१९१७: बाल्फोर घोषणापत्र - पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांसाठी राष्ट्रीय घराच्या स्थापनेसाठी ब्रिटीशांच्या समर्थनाची घोषणा केली.

१८६८: न्यूझीलंड - देशाने अधिकृतपणे राष्ट्रीय स्तरावर पाळली जाणारी प्रमाणित वेळ स्वीकारली.

आज यांचा जन्म

१९६५: शाहरुख खान - भारतीय अभिनेते व निर्माते - पद्मश्री

१९६०: अनु मलिक - भारतीय संगीतकार - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

१९४१: अरुण शौरी - भारतीय पत्रकार, राजकारणी - पद्म भूषण, रॅमन मगसेसे पुरस्कार

१९३७: अवतार सिंग जौहल - भारतीय वंशाचे ब्रिटिश वंशवाद विरोधी प्रचारक आणि व्याख्याते (निधन: ८ ऑक्टोबर २०२२)

१९३५: शिरशेंदू मुखोपाध्याय - भारतीय बंगाली लेखक

१९२९: अमर बोस - बोस कॉर्पोरेशनचे संस्थापक (निधन: १२ जुलै २०१३)

१९२१: रघुवीर दाते - भारतीय ध्वनिमुद्रणतज्ञ

१८९७: सोहराब मेहेरबानजी मोदी - भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते (निधन: २८ जानेवारी १९८४)

१८८२: डॉ. के. बी. लेले - भारतीय जादूगार, महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य (निधन: २ मे १९६३)

१८३३: महेन्द्र लाल सरकार - इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सचे संस्थापक

आज यांची पुण्यतिथी

१८८५: बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर - नाटककार (जन्म: ३१ मार्च १८४३)

१९८४: शरद्चंद्र मुक्तिबोध - मराठी साहित्यिक

१९९०: भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे - प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, पद्मभूषण, डि. लिट. (पुणे विद्यापीठ), उद्योजक (जन्म: २१ डिसेंबर १९०३)

२०१२: येरेन नायडू - तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते (जन्म: २३ फेब्रुवारी १९५७)

२०१२: श्रीराम शंकर अभ्यंकर यांचे निधन भारतीय-अमेरिकन गणितज्ञ (जन्म: २२ जुलै १९३०)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

MP Prajwal Revanna : माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना दोषी, जन्मठेपेची शिक्षा

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

IND vs ENG Mohammed Siraj : डीएसपी सिराजचा अनोखा पराक्रम! सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम मागे टाकत केली ऐतिहासिक कामगिरी

Red Soil Story : कोकणातील 'त्या' युट्यूबरचे निधन, स्टोरी टाकत दिली माहिती