लोकशाही स्पेशल

दिनविशेष 29 ऑक्टोबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : shweta walge

Dinvishesh 29 October 2023 : सध्या ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 29 ऑक्टोबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१५: चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.

२००८: डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.

२००५: दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार.

१९९९: चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान.

१९९७: अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.

१९९७: अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.

१९९६: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड.

१९९६: स्वदेशात बनविलेली कामिनी ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक् कम येथे कार्यान्वित करण्यात आली.

१९९४: विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा होमी भाभा पुरस्कार डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर.

१९६४: टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.

१९६१: संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले.

१९५८: महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान.

१९२२: बेनिटो मुसोलिनी इटलीचे पंतप्रधान बनले.

१८९४: महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना.

आज यांचा जन्म

१९८५: विजेंदर सिंग - भारतीय बॉक्सर - पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न

१९८५: कॅल क्रचलो - इंग्लिश मोटरसायकल रेसर

१९७१: मॅथ्यू हेडन - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९३४: माणिकराव होडल्या गावित - भारतीय राजकारणी, खासदार (निधन: १७ सप्टेंबर २०२२)

१९३२: वेल्मा बारफिल्ड - १६६२ नंतर अमेरिकेत फाशीची शिक्षा मिळणाऱ्या पहिल्या महिला (निधन: २ नोव्हेंबर १९८४)

१९३१: प्रभाकर तामणे - साहित्यिक व पटकथालेखक (निधन: ७ मार्च २०००)

१९३१: वाली - भारतीय कवी, गीतकार, आणि अभिनेते (निधन: १८ जुलै २०१३)

१८९७: जोसेफ गोबेल्स - जर्मनीचे चॅन्सेलर व नाझी नेते (निधन: १ मे १९४५)

१८८९: ली डझाओ - चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सह-संस्थापक (निधन: २८ एप्रिल १९२७)

१२७०: संत नामदेव - भारतीय संत (निधन: ३ जुलै १३५०)

आज यांची पुण्यतिथी

२०२०: केशुभाई पटेल - गुजरातचे १०वे मुख्यमंत्री (जन्म: २४ जुलै १९२८)

१९८८: कमलादेवी चट्टोपाध्याय - भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या - रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: ३ एप्रिल १९०३)

१९८१: दादा साळवी - अभिनेते

१९७८: वसंत रामजी खानोलकर - भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे - पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: १३ एप्रिल १८९५)

१९५७: लुईस बी. मेयर - एकेडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सचे स्थापक (जन्म: ४ जुलै १८८२)

१९३३: पॉल पेनलीव्ह - फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ (जन्म: ५ डिसेंबर १८६३)

१९११: जोसेफ पुलित्झर - हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक (जन्म: १० एप्रिल १८४७)

१८०४: सारा क्रॉसबी - इंग्रजी उपदेशक, पहिल्या महिला मेथोडिस्ट उपदेशक (जन्म: ६ ऑक्टोबर १७२९)

१३३९: ग्रँड प्रिन्स अलेक्झांडर मिखाइलोविच - ग्रँड प्रिन्स ऑफ ट्वेर (जन्म: ७ ऑक्टोबर १३०१)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य

Home Loan Intrest Rate : गृहकर्जदारांना दिलासा ! PNB, Indian Bank आणि Bank Of India ने केली व्याजदरात कपात

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'