Dinvishesh 30 November 2023 : सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 30 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२०००: पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन एन्डेव्हर या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.
१९९८: एक्सॉन आणि मोबिल यांच्यामध्ये ७३.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स चा करार झाल्यामुळे एक्सॉनमोबिल ही जगातील सर्वात मोठी कंपनी तयार झाली.
१९९६: ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.
१९९५: ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म संपल्याची अधिकृत घोषणा.
१९६६: बार्बाडोसला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९६१: १९५९ मध्ये प्रकाशित आल्हाद चित्रच्या सांगत्ये ऐका या बोलपटाने पुणे येथील विजयानंद सिनेमागृहात ५५१ दिवस चालण्याचा विक्रम केला.
१९१७: कलकत्ता येथे आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युटची स्थापना.
१८७२: हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.
आज यांचा जन्म
१९६७: राजीव दिक्षीत - सामाजिक कार्यकर्ता (निधन: ३० नोव्हेंबर २०१०)
१९४५: वाणी जयराम - भारतीय पार्श्वगायिका - पद्मा भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: ४ फेब्रुवारी २०२३)
१९३६: तुलसीदास बलराम - भारतीय फुटबॉलपटू (निधन: १६ फेब्रुवारी २०२३)
१९३५: आनंद यादव - मराठी लेखक
१९१०: कवी बाकीबाब - भारतीय गोमंतकीय कवी - पद्मश्री (निधन: ९ जुलै १९८४)
१८५८: जगदीशचंद्र बोस - भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: २३ नोव्हेंबर १९३७)
आज यांची पुण्यतिथी
२०१४: जर्बोम गॅमलिन - अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री (जन्म: १६ एप्रिल १९६१)
२०१२: इंद्रकुमार गुजराल - भारताचे १२ वे पंतप्रधान (जन्म: ४ डिसेंबर १९१९)
२०१०: राजीव दिक्षीत - सामाजिक कार्यकर्ता (जन्म: ३० नोव्हेंबर १९६७)
१९९५: वा. कृ. चोरघडे - मराठी साहित्यिक (जन्म: १६ जुलै १९१४)