लोकशाही स्पेशल

उद्या घरोघरी होणार बाप्पांचे आगमन; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

लाडक्या गणरायाचे उद्या घरोघरी आगमन होणार आहे. घरोघरी आणि सार्वजानिक गणेश मंडळात, एकदंत, विघ्नहर्ता गणरायाचे आगमन होणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया!’…एक..दोन..तीन..चार…गणपतीचा जय जयकार!…असा जयघोष…ढोल-ताशांचा घुमणारा आवाज…गुलाल, फुलांची उधळण…अशा उत्साहात उद्या बाप्पाचं आगमन होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

लाडक्या गणरायाचे उद्या घरोघरी आगमन होणार आहे. घरोघरी आणि सार्वजानिक गणेश मंडळात, एकदंत, विघ्नहर्ता गणरायाचे आगमन होणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया!’…एक..दोन..तीन..चार…गणपतीचा जय जयकार!…असा जयघोष…ढोल-ताशांचा घुमणारा आवाज…गुलाल, फुलांची उधळण…अशा उत्साहात उद्या बाप्पाचं आगमन होणार आहे. बाप्पांच्या आगमनाची तयारी आज सुरू असून विविध भागात मूर्तीची विक्री करणारे शेकडो स्टॉल शहरात लागले आहेत. पूजेच्या तयारीसाठी लागणारे साहित्य, तसेच मूर्ती खरेदीसाठी सर्व बाजारपेठेमध्ये गर्दी दिसून येत आहे.

शुभ मुहूर्त

गणेश चतुर्थी: बुधवार, 31 ऑगस्ट 2022

गणपती मूर्ती स्थापनेचा मुहूर्त : 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11.5 ते दुपारी 1.38 स्थापन करता येईल.

पूजेची तयारी

गणेशाची छोटी मूर्ती, श्रीफळ, कापड, कापसाची माळा, हार, सुट्टी फुले व नाणी, अत्तर, गूळ-खोबरे, सुपारी, देठाची पाने, मिठाई, मोदक, कापसाचे वस्त्र, अगरबत्ती, कापूर, दूर्वा, हळदी-कुंकू-अबीर-गुलाल, दिवा, तेल, समई, वाती, फळे, पंचामृत, नैवेद्य, चंदन, अष्टगंध, पळी, पंचपात्र, जानवे, शमीपत्रे, आंब्याची डहाळी, ताम्हण, कलश, शंख, घंटा, अक्षता आदी साहित्य लागतात.

गणपती प्रतिष्ठापना विधी

प्रथम कपाळाला गंध लावून आचमन करावे. देवापुढे देवापुढे विड्याचे पान त्यावर नाणे आणि सुपारी ठेवावी. देवास नमस्कार करून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि पुजेला प्रारंभ करावा. आसनावर बसावे. हातात अक्षता घेऊन श्रीगणेशाचे मनात स्मरण करावे. अक्षता श्रीगणेशाच्या पायांवर वाहाव्यात. उजव्या हातात दोन पळ्या पाणी घेऊन त्यात गंध, अक्षता, फुले घेऊन मंत्रोच्चार करावा. श्रीगणेशाचे स्मरण करून कलश, शंख, घंटा, दिवा, समई यांची पूजा करावी गंध, अक्षता, फुले, हळद कुंकू वहावे.

नमस्कार करून उजवा हात मूर्ती वर ठेवावा डावा हात स्वतःच्या हृदयास स्पर्श करून श्रीगणेशाचे ध्यान करावे. गणेशाच्या चरणांवर दुर्वा किंवा फुलाने पाणी शिंपडावे. गणपतीच्या चरणांवर गंध फुल अक्षता वाहावे. ताम्हणात 4 वेळा पाणी सोडावे. गणेशाच्या मूर्तीवर पाणी शिंपडावे, चरणांवर पंचामृत वहावे, अक्षता वाहाव्यात. गंध लावावे, हळद, शेंदूर, फुले,हार, कंठी, दुर्वा वाहाव्यात. धूप, अगरबत्ती ओवाळावी. दीप, निरांजन ओवाळावे. नैवेद्य, प्रसाद अर्पण करावा. विड्यावर दक्षिणा ठेवावी, समोरील नारळावर पळीभर पाणी सोडावे आणि त्यावर एक फुल वाहावे. आरती करावी, स्वतः भोवती प्रदक्षिणा घालावी.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope|'या' राशीच्या व्यक्तींचा पगार वाढण्याची शक्यता, तर दिवस असेल उत्साहवर्धक जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस ?

BEST Bus On Special Report : बेस्ट चांगल्या दिवसांच्या वाटेवर, बेस्टच्या उत्पन्नात मोठी वाढ

Latest Marathi News Update live : नांदेडमध्ये परिचारिका संघटनेचे काम बंद आंदोलन

Jitendra Awhad vs Gopichand Padalkar : विधानभवनातील गोंधळावर उद्धव ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया; "गुंडांना पास कोणी दिले, याचा शोध घ्या....!