Dinvishesh 
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : इंदिरा गांधींची निवडणूक रद्द

सबाअंजुम करीम यांचा , पु.ल.देशपांडे यांचे निधन

Published by : shweta walge

सुविचार

स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरी आपले दुःख खरेदी करणारा या जगात कोणीच नसतो.

आज जागतिक बालकामगार विरोधी दिवस : सन २००२ पासून जागतिक बालकामगार विरोधी दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. बालकामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता हा दिवस साजरा केला जातो.

आज काय घडले

  • १९०५ साली गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची पुण्यात स्थापना केली. धर्म व जाती यांच्यातील विरोध नष्ट करून सलोखा निर्माण करणे, शिक्षणाचा प्रसार करणे हा त्यांचा हेतू होता.

  • १९६४ मध्ये दक्षिण आफ्रिकेचे गांधी म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध वर्णद्वेषी विरोधी नेता नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात आली.

  • १९७५ मध्ये अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द केली. तसेच त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.

  • १९९६ मध्ये भारतीय पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.

आज यांचा जन्म

  • बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक पुरुषोत्तम बापट यांचा १८९४ मध्ये जन्म झाला.

  • लेखक, कथा, कादंबरीकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा १९१७ मध्ये जन्म झाला. त्यांनी १९४१ ते १९८४ या काळात विपुल आणि दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखन केले.

  • अमेरिकेचा ४१वे राष्ट्राध्यक्ष जार्ज बुश यांचा १९२४ मध्ये जन्म झाला. २० जानेवारी १९८९ ते २० जानेवारी १९९३ या कालखंडात त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली.

  • पद्मश्री व अर्जुन पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट भारतीय हॉकी खेळाडू सबाअंजुम करीम यांचा १९८५ मध्ये जन्म झाला.

आज यांची पुण्यतिथी

  • मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे १९६४ मध्ये निधन झाले.

  • महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित आठ खंडांच्या ग्रंथाचे लिखाण करणारे लेखक डी.जी. तेंडूलकर यांचे १९७२ मध्ये निधन झाले.

  • संस्कृत साहित्यातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गोपीनाथ कविराज यांचे १९७६ मध्ये निधन झाले. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.

  • भारताचे माजी सरन्यायाधीश प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर यांचे १९८१ मध्ये निधन झाले. १९६४ पासून मार्च १९६६ पर्यंत ते सरन्यायाधीश होते.

  • मराठी मनावर दीर्घ काळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे लेखक पु. ल. देशपांडे यांचे २००० मध्ये निधन झाले. कवी, नाटककार, अभिनेता , दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार म्हणूनही त्यांची ओळख आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

BEST Bus On Special Report : बेस्ट चांगल्या दिवसांच्या वाटेवर, बेस्टच्या उत्पन्नात मोठी वाढ

Latest Marathi News Update live : नांदेडमध्ये परिचारिका संघटनेचे काम बंद आंदोलन

Jitendra Awhad vs Gopichand Padalkar : विधानभवनातील गोंधळावर उद्धव ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया; "गुंडांना पास कोणी दिले, याचा शोध घ्या....!

shravan 2025 : महाराष्ट्रात 25 जुलैपासून शुभारंभ, चार श्रावणी सोमवारांसह सणांचा महापर्व, जाणून घ्या...