कुटुंबानंतर माणूस जे पहिले नाते निर्माण केले त्याला मैत्री म्हणतात. कुटुंबाबाहेर, मित्र हा तुमचा मार्गदर्शक, सल्लागार, हितचिंतक असतो. या मैत्रीला एक खास दिवस समर्पित करण्यात आला आहे, जो फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. फ्रेंडशिप डे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यंदा 4 ऑगस्टला हा खास दिन साजरा केला जाणार आहे. आम्ही तुम्हाला काही खास आणि अनोखे मेसेज, आणि कोट्स बद्दल सांगत आहोत जे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत या खास दिवशी शेअर करू शकता.
कुठलंही नातं नसताना
आयुष्यभर साथ देते ती मैत्री
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
रोज आठवण न यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही,
मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात आणि
तुला याची खात्री आहे यालाच मैत्री म्हणतात!
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
मैत्री चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी
एक वेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी!
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे
बोलू शकतो, रागावू शकतो आणि
आपलं मन हलकं करू शकतो
ती म्हणजे जिवलग मैत्री...
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
एक भास
जो कधीही दुखावत नाही
आणि एक गोड नातं
जे कधी संपतच नाही
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!