चटकदार

Anarsa Recipe : अधिक मासात जावयांसाठी अनारसे बनवायचेत? 'या' सोप्या स्टेप्स करा फॉलो

अधिक मासात चवदार अनारसे विशेषतः बनवले जातात. लग्नानंतर मुलगी आणि जावयाला घरी बोलवून अधिक महिन्यानिमित्त अनारसेचे ताट देण्यात येते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Anarsa Recipe : भारतीय पारंपारिक गोड अनारसेची चव तोंडात वेगळाच गोडवा असतो. अधिक मासात चवदार अनारसे विशेषतः बनवले जातात. लग्नानंतर मुलगी आणि जावयाला घरी बोलवून अधिक महिन्यानिमित्त अनारसेचे ताट देण्यात येते. सणासुदीच्या काळात अनारसे खास बनवले जातात. आजकाल बाजारात अनारसे सहज उपलब्ध आहेत. परंतु, तुम्हाला स्वादिष्ट अनारसे घरी बनवायचे असतील तर त्याची अतिशय सोपी रेसिपी आम्ही सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया स्वादिष्ट अनारसे बनवण्याची सोपी रेसिपी...

साहित्य

तांदूळ - २ कप

दही - 1 टेस्पून

तीळ - 2-3 चमचे

पिठीसाखर - 3/4 कप

देशी तूप - तळण्यासाठी

कृती

अनारसा चवीने परिपूर्ण बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ दोन ते तीन दिवस (किमान ४८ तास) अगोदर पाण्यात भिजत ठेवा. अनारसेसाठी लहान नवीन तांदूळ वापरणे चांगले. तांदूळ भिजवताना दर 24 तासांनी त्याचे पाणी बदला. ठरलेल्या वेळेनंतर तांदळाचे पाणी काढून टाकावे व भिजवलेले तांदूळ जाड कापडावर पसरून सुकविण्यासाठी सावलीच्या जागी ठेवावे.

तांदळाचे बहुतेक पाणी सुकल्यानंतर मिक्सरच्या मदतीने तांदूळ भरड पिठासारखे बारीक करा आणि एका भांड्यात काढा. यानंतर हे पीठ चाळणीने चाळून घ्या आणि एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये ठेवा. आता पिठात पिठीसाखर आणि थोडं तूप घालून नीट मिक्स करून घ्या. आता दही टाकून पीठ घट्ट मळून घ्या. यानंतर पीठ 10-12 तास झाकून बाजूला ठेवा.

ठरलेल्या वेळेनंतर पीठ घेऊन परत एकदा मळून घ्या. यानंतर पिठाचे छोटे गोळे करून तीळात गुंडाळा. कणकेभोवती तीळ चांगला चिकटला की दोन तळहातांमध्ये दाबून चपटा करा. त्याचप्रमाणे सर्व बॉल्समधून अनारसे बनवा. यानंतर एका पातेल्यात देशी तूप टाकून मध्यम आचेवर गरम करा. तूप गरम होऊन वितळल्यावर त्यात अनारसे टाका आणि अनारसे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. यानंतर अनारसे एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा. त्याचप्रमाणे सर्व अनारसे तळून घ्या. आता अनारसे थंड होऊ द्या. आणि चविष्ट अनारसे तयार आहेत. त्यांना हवाबंद डब्यात ठेवा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

IND vs ENG Mohammed Siraj : डीएसपी सिराजचा अनोखा पराक्रम! सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम मागे टाकत केली ऐतिहासिक कामगिरी

Red Soil Story : कोकणातील 'त्या' युट्यूबरचे निधन, स्टोरी टाकत दिली माहिती

Tuljapur Temple : श्री तुळजाभवानी मंदिरातून शस्त्रपूजनातील तलवार गायब? उडाली एकच खळबळ