क्रीडा

Cricket In 2028 Olympics : ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे संघ भिडणार ! तब्बल 128 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा तब्बल १२८ वर्षांनी समावेश

Published by : Prachi Nate

आगामी ऑलिंपिक गेम्समध्ये क्रिकेटसह पाच नवीन खेळांचा समावेश झाला आहे. आयओसीने 2023मध्ये बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅशसह क्रिकेटचा समावेश करण्यास मान्यता दिली होती. 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक असोसिएशनने अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे 2028 मध्ये होणाऱ्या क्रिकेटच्या समावेशाला मान्यता दिली होती. ऑलिम्पिकमध्ये तब्बल 128 वर्षांनी पुन्हा चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळणार आहे. लॉस एंजेलिस गेम्समध्ये सहा संघ खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक असोसिएशनने आता स्पष्ट केले आहे की 2028 च्या एलए ऑलिंपिकमध्ये पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी 6 संघ क्रिकेटमध्ये सहभागी होतील. तसेच पुरुष आणि महिलांच्या संघामध्ये 6 खेळाडू पाहायला मिळतील. हे सामने टी-20 आंतरराष्ट्रीय स्वरूपात खेळवले जातील. त्याचसोबत पहिल्या तीन संघांसाठी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके असणार आहेत.

ज्यात पुरुष गटात भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यासारख्या दिग्गज संघांचा समावेश असणार आहे. तर महिला संघांनाही पात्रता मिळविण्यासाठी कठीण स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान महिला आणि श्रीलंका या संघात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिकमध्ये जोरदार चुरस रंगलेली पाहायला मिळेल.

1900 मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता. फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन फक्त या दोन संघांनीच भाग घेतला होता. ही स्पर्धा फक्त पुरुष संघांमध्ये झाली आणि ग्रेट ब्रिटनने सुवर्णपदक जिंकले होते. ज्यात परंतु, त्यानंतर झालेल्या स्पर्धांमधून क्रिकेट वगळण्यात आले होते. पण, आता पुन्हा एकदा समावेश केल्याने ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर