गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला भारत आणि इंग्लंड यांच्यातील थरार अखेर शेवटच्या टप्प्यावर असताना 2-2 अशी बरोबरी करत पार पडला आहे. केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी निर्णायक शेवटासह संपन्न झाली आहे. या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडच्या तोंडातला घास हिसकावत ऐतिहासिक विजय मिळला असून अवघ्या 6 धावांनी विजय मिळवला आहे.
अत्यंत रोमांचक झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने ही मालिका विजयासह संपवली. पाचव्या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर 374 धावांचे आव्हान दिले होते. ज्याच्या पाठलाग करत इंग्लंडने 367 धावा करत हातातला डाव गमावला. यावेळी मोहम्मद सिराजने केलेल्या शानदार गोलंदाजीमुळे आणि प्रसिद्ध कृष्णाने दिलेली साथ यामुळे अंतिम सामन्याचे चित्र पालटले.
हॅरी ब्रूक आणि जो रूट या दोघांनी मिळून शतकी खेळी खेळली होती. ज्यामुळे इंग्लंडच्या विजयाच्या आशा प्रबळ दिसत होत्या. पण भारताच्या प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज या जोडीने शेवटच्या क्षणापर्यंत मारलेल्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंडच्या तोंडातला घास भारताने हिसकावला आणि 367 धावांवर इंग्लंडचा संघ आटोपला. या विजयाने भारताने केवळ सामना नव्हे, तर मालिकाही वाचवली.