आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. सनरायझर्स हैदराबाद म्हटलं की त्यांच्या जोरदार फटकेबाजी करणारे फलंदाज डोळ्यासमोर येतात. मात्र यावेळी गुजरातच्या गोलंदाजांनी त्यांना 150 धावांसाठी तरसवलं आहे. हैदराबादचा संघ 152 धावांवर ढेर झाला आहे. त्यामुळे गुजरातसमोर 153 धावांच आव्हान देण्यात आलं होत. ज्यात गुजरातचा 7 विकेट्सने हा सामना जिंकला आहे. तर हैदराबादचा हा चौथा पराभव आहे.