क्रीडा

विराटने रचला नवा विक्रम; ५०० व्या सामन्यात सचिनसोबत 'या' खास क्लबमध्ये सामील

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन कसोटी सामन्यात शतक झळकावले आहे. सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी (21 जुलै) कोहलीने शॅनन गॅब्रिएलच्या चेंडूला चौकार मारुन आपले शतक पूर्ण केले. कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील हे 29 वे शतक होते. या शतकासह विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय शतकांची संख्या आता 76 वर पोहोचली आहे. कोहलीने 206 चेंडूत 11 चौकारांसह 121 धावा केल्या. दरम्यान, कोहलीला अल्झारी जोसेफने धावबाद केले.

विराट कोहलीने मोठ्या कालावधीनंतर परदेशी भूमीवर कसोटी शतक झळकावले आहे. यापूर्वी, त्याने 16 डिसेंबर 2018 रोजी ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे आपले शेवटचे कसोटी शतक पूर्ण केले होते. आता 1677 दिवस आणि 31 डावांनंतर त्याने परदेशी भूमीवर कसोटी शतक झळकावले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध कोहलीचे हे तिसरे कसोटी शतक ठरले. यापूर्वी त्याने नॉर्थसाऊंड (200) आणि राजकोट कसोटी (139) शतके झळकावली होती.

कसोटी शतकांच्या बाबतीत कोहलीने आता ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमनची बरोबरी केली आहे. विराट कोहलीचे या वर्षातील कसोटी क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटी सामन्यात 186 धावांची खेळी केली होती. फॅब-4 फलंदाजांमध्ये स्टीव्ह स्मिथ (32) आणि जो रूट यांच्या नावावर कोहलीपेक्षा जास्त कसोटी शतके आहेत. यासोबतच त्याने आता कसोटी शतकांच्या बाबतीत केन विल्यमसनला (28) मागे टाकले आहे.

५०० व्या सामन्यात शतक करणारा पहिला खेळाडू

विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे, जो त्याने शानदार खेळी खेळून संस्मरणीय बनवला आहे. आपल्या 500व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा कोहली पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी एकाही फलंदाजाला 500 व्या सामन्यात 50 धावाही करता आल्या नाहीत. याआधी 500व्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कुमार संगकाराच्या नावावर होता, याने 48 धावांची खेळी केली होती.

या शानदार खेळीदरम्यान, विराट कोहली जॅक कॅलिसला मागे टाकत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आला. या डावात विराटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 2000 धावाही पूर्ण केल्या. भारतीय फलंदाजांमध्ये विराटशिवाय केवळ रोहित शर्मालाच ही कामगिरी करता आली आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक शतके (आंतरराष्ट्रीय सामने)

13 - सुनील गावस्कर

12 - जॅक कॅलिस

12 - विराट कोहली

11 - एबी डिव्हिलियर्स

कसोटीत चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक शतके

44 - सचिन तेंडुलकर (भारत)

35 - जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)

30 - महेला जयवर्धने (श्रीलंका)

25 - विराट कोहली (भारत)

24 - ब्रायन लारा (वेस्ट इंडिज)

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

हरियाणात भाविकांच्या बसला भीषण आग

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशी स्थगित