ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टेस्ट मॅचकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष वेधले होते. मात्र, भारताच्या उत्साहावर विरजण पडलं आहे. ऑस्ट्रेलियाने होमग्राऊंडवर भारताला नमवून विजयी सलामी दिली आहे.
भारतासमोर विजयासाठी ३४० धावांचं लक्ष्य होतं. मात्र, टीम इंडियाचा दुसरा डाव केवळ १५५ धावांवरच आटोपला. भारताच्या ७ फलंदाजांनी तासाभरात एकापाठोपाठ आपल्या विकेट्स गमावल्या. एकूण ३०० पेक्षा जास्त कमावताना टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागण्याची ही कसोटीमधील ४९ वी वेळ आहे.
मेलबर्न कसोटीत भारताचा १८४ धावांनी पराभव झाला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये २-१ ने आघाडी मिळवली आहे. आजचा दिवस भारतीय संघासाठी थोडा निराशाजनकच होता. भारतीय संघ दमदार फलंदाजी करण्यास कमी पडला म्हणून पराभव झाला असल्याचं बोललं जात आहे. एका क्षणी भारतीय संघ हा सामनाही ड्रॉ करेल असं चित्र असताना भारताच्या फलंदाजांनी या निर्णयावर पाणी फेरलं.
चौथ्या दिवशी ९ गडी गमावून ३३३ धावांची आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ५व्या दिवशी आपल्या धावसंख्येत आणखी ६ धावांची भर घातली आणि भारताला ३४० धावांचे लक्ष्य दिले. मेलबर्नच्या मैदानावर हे विजयी लक्ष्य गाठणं टीम इंडियासाठी मोठे आव्हान होते, कारण आतापर्यंत या मैदानावर सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग ३३२ धावांचा होता. पण भारताच्या युवा फलंदाजांनी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत कसोटी ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला पण ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीपुढे फलंदाजांनी शरणागती पत्करली.
ऑस्ट्रेलियाने मेलबर्नमधील विजयासह या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता पुढचा आणि अखेरचा सामना ३ जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळवला जाणार आहे. भारताला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर सिडनी कसोटी भारताला कोणत्याही स्थितीत जिंकावी लागेल.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-