क्रीडा

भारतीय क्रिकेट संघाला ‘ओमायक्रॉन’चा फटका; दक्षिण आफ्रिका दौऱ्यासंदर्भात BCCI ने घेतला ‘हा’ निर्णय

Published by : Lokshahi News

दक्षिण आफ्रिकेतील ओमीक्रॉन (कोरोनाचा नवा विषाणू) याचा धोका वाढत असतानाही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत आशावादी आहे. भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा किमान एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आला आहे. सध्या भारतीय क्रिकेट नियमन मंडळ म्हणजेच बीसीसीआय क्रिकेट साऊथ आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करत आहेत. कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

भारत अ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेमध्येच आहेत. मात्र या दौऱ्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार सामने खेळवले जात असले तरी भारताच्या मुख्य संघाच्या नियोजित दौऱ्यामध्ये ओमाक्रॉनच्या प्रादुर्भावाच्या दृष्टीने बदल करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. भारतीय संघ नियोजित वेळापत्रकानुसार ९ डिसेंबर रोजी चार्टड विमानाने दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होता.

या दौऱ्याच्या वेळापत्रकामध्ये बदल झाल्यामुळे संघामध्येही बदल होणार आहेत. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सध्या सुरु असणाऱ्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या कालावधीमध्ये निवड समितीची दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी संघ निवड करण्यासाठी बैठक होणार होता. मात्र सध्या बीसीसीआय दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाच्या संपर्कात असून तेथील करोना संसर्गाच्या परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. हे चित्र पूर्ण स्पष्ट झाल्यानंतरच निवड समितीची बैठक घेतली जाणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Periods Delaying Pills : धक्कादायक! मासिक पाळी थांबवण्यासाठी गोळ्या खाणं जीवावर बेतलं; तरुणीचा मृत्यू

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवावर सीसीटीव्हीची करडी नजर; 15 हजार पोलिसांचा बंदोबस्त

Latest Marathi News Update live : मुंबईच्या राज्याचे प्रथम दर्शन