थोडक्यात
भारत - पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारताचा दणदणीत विजय
भारतीय फलंदाजांनी दमदार खेळी करत पाकिस्तानचा धुव्वा उडवला
भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून दमदार विजय
(India vs Pakistan) भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारताचा दणदणीत विजय झाला आहे. आशिया कप सुपर फोर सामन्यात भारताने दुबईत पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला असून भारतीय फलंदाजांनी दमदार खेळी करत पाकिस्तानचा धुव्वा उडवल्याचे पाहायला मिळाले. टॉस जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने भारताला विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं.
अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने जबरदस्त कामगिरी केली. भारताने 18.5 ओव्हरमध्ये 174 धावा करत सामना 6 विकेट्सने जिंकला. यासोबतच हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, संजू सॅमसन या तिघांनीही चांगली बॅटिंग केली. भारताच्या या विजयामुळे पाकिस्तानला सलग दुसऱ्या सामन्यात हार पत्करावी लागली.
अभिषेकने 39 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 6 फोरसह सर्वाधिक 74 रन्स केल्या तर शुबमनने 28 बॉलमध्ये 8 फोरसह 47 रन्स केल्या. शुबमननंतर सूर्यकुमार यादव तिसऱ्या मैदानात आला मात्र तो झिरोवर आऊट झाला. सूर्यानंतर तिलम मैदानात आला तर अभिषेकनंतर संजू सॅमसन आला.
संजूने 13 धावा करुन ऑऊट झाला त्यानंतर तिलकने 19 बॉलमध्ये 30 रन्स केल्या. तर हार्दिकने 7 धावा केल्या. या सामन्यात भारताने साखळी फेरीनंतर सुपर 4 मध्येही पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताच्या विजयानंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.