Thane Metro
Thane Metro

Thane Metro : ठाणे शहरातील पहिली मेट्रो लवकरच होणार सुरू; आज होणार मेट्रोची ट्रायल

आज होणार ठाणे मेट्रोची ट्रायल
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • ठाणे शहरातील पहिली मेट्रो लवकरच होणार सुरू

  • आज होणार ठाणे मेट्रोची ट्रायल

  • मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

(Thane Metro ) ठाणे शहरातील पहिली मेट्रो लवकरच सुरु होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज मेट्रोची ट्रायल होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ठाणे मेट्रोच्या ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

पहिल्या टप्प्यात कॅडबरी जंक्शन ते गायमुख अशी 10.5 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू होणार आहे. ठाणे मेट्रोची शहरात 10 स्टेशन असणार असून ठाणेकरांना शहरातील वेगवेगळ्या भागातून या स्टेशनवर जाऊन मेट्रो पकडता येणार असून गायमुख ते विजयनगर या चार स्थानकादरम्यान मेट्रोची ट्रायल घेण्यात येणार आहे.

कॅडबरी जंक्शन, माजीवाडा, कपूरबावाडी, मानपाडा, टिकूजी -नी -वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासरवाडावली, गव्हाणपाडा, गायमुख ही मेट्रोची स्टेशन असतील. यामुळे आता ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com